कल्याण रोड, बालिकाश्रम रोड व नालेगाव परिसराला पूर्ण दाबाने पाणी द्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 8, 2021

कल्याण रोड, बालिकाश्रम रोड व नालेगाव परिसराला पूर्ण दाबाने पाणी द्या.

 कल्याण रोड, बालिकाश्रम रोड व नालेगाव परिसराला पूर्ण दाबाने पाणी द्या.

शिवसेना स्टाईलने नगर सेवकांचा आंदोलनाचा इशारा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बालिकाश्रम रोड, कल्याण रोड, व नालेगाव परिसरातील पाणी प्रश्न गंभीर बनला असून महापालिका प्रशासनाने लवकारात लवकर उपाय योजना कराव्यात अन्यथा महापालिकेमध्ये शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा माजी उपमहापौर अनिल बोरूडे, नगरसेवक शाम नळकांडे, नगरसेवक गणेश कवडे, यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांची शिष्टमंडळासह भेट घेवुन दिला.

यावेळी उपायुक्त यंशवत डांगे यांनी पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते उद्या तांबडतोब पाणी पुरवठा विभागाची बैठक बोलवण्याचे आदेश दिले. यावेळी नगरसेवकांनी उपायुक्त डांगे यांच्या कामाचे कौतुक केले. घनकचरा विभागाच्या कामाचे नियोजन केले. तसेच पाणीपुरवठा विभागाचे नियोजन करून पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली.

नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे. मध्यरात्री पाणी दिले जाते. बालिकाश्रम रोड परिसराला पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पाणी प्रशन हा नागरिकांचा मुलभुत प्रश्न आहे. नागरिकांना पुर्ण दाबाने पाणी देणे हे आपले कर्तव्य आहे. कल्याण रोड परिसराला 10 ते 12 दिवस पाणी पुरवठा केला जात नाही. तसेच पाणी दिल्यानंतर पुर्ण दाबाने सोडले जात नाही त्याच बरोबर काही भागांमध्ये पाईपलाईन नसल्यामुळे टॅकरने पाणी पुरवठा केला जातो. यासाठी टॅकरचे खेपा वाढाव्या नालेगावामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून तो सुरळीत करावा. मुळाधरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा असतांना नगर शहरात पाणी टचांई का निर्माण होते? पूर्ण दाबाने पाणीसाठा का मिळत नाही? यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्या नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here