आ. अरुण जगतापांनी टोचून घेतली कोरोना लस. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 29, 2021

आ. अरुण जगतापांनी टोचून घेतली कोरोना लस.

 आ. अरुण जगतापांनी टोचून घेतली कोरोना लस.

मोफत लसीकरण केंद्राचा शुभारंभ.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ संचालित गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद रूग्णालयात महापालिकेच्या सहकार्याने सिरामच्या मोफत कोविड 19 च्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष आ.अरुण जगताप यांनी स्वतः लस घेवून व दीपप्रज्वल करून केले.

आ. अरुण जगताप म्हणाले, संपूर्ण जगात धुमाकूळ घालणारा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व नागरिकांसाठी शासनाने कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु केले आहे. करोना पासून वाचण्यासाठी नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सिरमची लस घेण्यास प्राधान्य द्यावे. गुणे आयुर्वेद रुग्णालय शेकडो वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करत आहे. आता याठिकाणी करोनाची मोफत लस मिळणार असल्याने जास्तीतजास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गुणे आयुर्वेद रुग्णालयात शासनाच्या नियमानुसार याठिकाणी नागरिकांना दरोरज सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत मोफत लस मिळणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजली देशमुख यांनी दिली.
यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायक्त डांगे, महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक गणेश भोसले, अजय ढोणे, गुणे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजली देशमुख, यशवंत सुरकुटला, अरविंद शिंदे, वैशाली ससे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.समीर होळकर, डॉ.सुरज ठाकूर आदी उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here