निलेशला समाजकार्याचं वेड लागलंय : अण्णा हजारे यांची कौतुकाची थाप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

निलेशला समाजकार्याचं वेड लागलंय : अण्णा हजारे यांची कौतुकाची थाप

 निलेशला समाजकार्याचं वेड लागलंय : अण्णा हजारे यांची कौतुकाची थाप

निलेशचं जिवन चरित्रं लिहावं, त्याचा खर्च मी देईल : हजारेनगरी दवंडी

पारनेर : प्रतिनिधी

 समाजकार्यापायी आमदार निलेश लंके यांना स्वतःच्या कुटूंबाकडेही लक्ष  देण्यासाठी वेळ मिळत नसल्याची तक्रार त्यांच्या पत्नीकडून केली जाते. आ. लंके यांचा हा त्याग मोठा आहे. समाजकार्याचं त्यांना वेड लागलं आहे. त्यांच्या जिवन चरित्र कोणी लिहिलं तर मी त्याचा संपूर्ण खर्च देईल असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.

४१ व्या वाढदिवसानिमित्त आ. लंके यांनी बुधवारी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांचे आशिर्वाद घेतले. त्यावेळी हजारे यांनी लंके यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. हजारे म्हणाले, आज वाढदिवस आहे म्हणून नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या लंके यांना शुभेच्छा  आहेत. राज्यात अनेक आमदार आहेत. मी आ.लंके यांच्या पाठीशी उभा राहतो याचे कारण त्यांचे काम आहे. सामाजिक, राष्ट्रीय भावनेतून ते जे काम करतात ते महत्वाचं आहे. प्रत्येक आमदाराने आ. लंके यांच्याप्रमाणे काम केले तर तो तालुका  देशामध्ये उठून दिसेल. आ. लंके यांना मी अनेक वर्षांपासून पाहतोय. त्यांचे चारित्र, आचार, विचार हे शुद्ध आहेत. जिवन निष्कलंक आहे. ते कुटूंबाकडे लक्ष देत नसल्याची तक्रार त्यांची पत्नी नेहमीच करते. त्यांचा हा त्याग आहे. असे काम  करायला वेड लागावे लागते. काही लोक अर्धवेडे झोलेेले आहेत. हा माणूस मात्र समाजहितासाठी संपूर्ण वेडा झालेला आहे. जेवण नाही, झोप नाही समाजहितासाठी सारखा प्रवास याचा अनुभव संपूर्ण राज्यातील जनता घेत आहे. त्यांचे जीवन चरित्र लिहीले गेले तर ते अनेकांना प्रेरणादायी ठरेल. चरित्र लिहून प्रसिद्ध करण्यासाठीचा खर्च मी करेल.त्यांच्या पाठीशी माझ्या नेहमीच शुभेच्छा राहतील असे हजारे यांनी सांगितले.


     आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदार संघात विविध उपक्रम राबविण्यात आले. पारनेर शहरासह राळेणसिद्धी, नारायणगव्हाण, पिंपळनेर, जवळे, पानोली, मांडवेखुर्द, देउळगांसिद्धी, सावरगांव, अरणगांव,जामगांव, भांडगांव, रूईछत्रपती, शिर्डी, श्रीगोंदे, संगमनेर, राहता येथे विशेष कार्यक्रांचे अयोजन करण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभुमिवर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेले सार्वजीक कार्यक्रम रद्द करण्यात येउन गर्दी होणार नाही याची काळजीही घेण्यात आली. आ. लंके यांनी हार तुऱ्यांऐवजी शालेय साहित्य भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यास उर्स्फुर्त प्रतिसाद लाभला.दिवसभरात तब्बल टेम्पोभर शालेय साहित्याचे संकलन झाले. वडनेर हवेली येथे जाणीव फाउंडेशनच्या वतीने एक लक्ष रूपये खर्चून  उभारण्यात आलेल्या बसथांब्याचे लोकार्पण करण्यात आले.भानुदास शेळके यांनी १ लाख, पुनम मुंगसे यांनी २१ हजार रूपयांची देणगी सामाजिक कार्यासाठी दिली.

 पारनेर शहरात विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा डोनेशन शिबिर पार पडले. त्यात उच्चांकी प्लाझ्मा दान करण्यात आले. पिंपळनेर येथे अशोक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. आ. लंके यांच्या हंगे या गावी सायंकाळी ग्रामस्थांकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

पारनेर शहरात युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय औटी , नगरसेवक नंदकुमार औटी यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद लाभला. १ हजार ४६ रक्तपिशव्यांचे तेथे संकलन करण्यात आले.

No comments:

Post a Comment