नगर-जामखेड रोडवर टाकळी काझी येथे अपघात : दुचाकीस्वार जागीच ठार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

नगर-जामखेड रोडवर टाकळी काझी येथे अपघात : दुचाकीस्वार जागीच ठार

 नगर-जामखेड रोडवर टाकळी काझी येथे अपघात : दुचाकीस्वार जागीच ठार नगरी दवंडी


अहमदनगर : नगर - जामखेड़ रस्त्यावर भरधाव वेगात ओव्हर टेक करण्याच्या नादात इको कारने (एम एच 04, जे व्ही 1831 )दुचाकीस्वारास ( एम एच 16, टी 8089) जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यु झाला. अपघातात चिचोंडी पाटीलचा युवक संतोष बाळासाहेब ठोंबरे या युवकाचा जागीच मृत्यु झाला. 

     नगर जामखेड रस्त्याचे नूतनीकरण झाल्याने वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवत आहेत.     

      घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कांस्टेबल सचीन वनवे यानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दुपारी दीडच्या दरम्यान चिचोंडी पाटील येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नूतनीकरणानंतर रस्त्याची उंची वाढल्यामुळे दुचाकीस्वारास रस्त्यावरून खाली उतरणे शक्य होत नाही. त्यामुळे ही अनेक अपघात घडतात. 

याबाबत टाकळीचे उपसरपंच अविनाश पवार यांनी खंत व्यक्त केली. व साईडपट्ट्या भरून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here