रांजणगाव मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

रांजणगाव मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन

 रांजणगाव मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजननगरी दवंडी

 पारनेर  - तालुक्‍यातील रांजणगाव मशीद येथे जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास सचिवालय इमारत रुपये २५ लाख, जिल्हा परिषद बांधकाम सभापती काशिनाथ दाते सर यांच्या प्रयत्नातून लेंडी ओढ्यावर बंधारा रुपये १२. ४८ लक्ष, व जवक मळा डांबरीकरण करणे रुपये १२ लक्ष तसेच पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या प्रयत्नातून वॉटर फिल्टर (आरो प्लांट) रुपये ३ लक्ष आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवार दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता सभापती काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषद जलसंधारण समितीचे सदस्य राहुल दादा शिंदे पाटील, गटविकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते.

   यावेळी सरपंच प्रीती इंद्रजीत साबळे, उपसरपंच बाबा तात्याभाऊ जवक, गजानन गाढवे, प्रभाकर देशमुख, गाढवे सर, प्रियंकाताई शिंदे, कल्याण गाढवे, शरद ढगे, अनिल जवक, शरद सरोदे, बंटी साबळे, भाऊ देशमुख, सोमनाथ सरोदे, आप्पा देशमुख, मोहन लोणकर, शौकत सय्यद, सुधीर खिलारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here