देहरे येथील मांगीरबाबा व मालोबा-बालोबा यात्रा रद्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

देहरे येथील मांगीरबाबा व मालोबा-बालोबा यात्रा रद्द

 देहरे येथील मांगीरबाबा व मालोबा-बालोबा यात्रा रद्दनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः देहरे (ता.नगर)येथील सालाबादप्रमाणे धूलिवंदनच्या दिवशी होणारी ग्रामदैवत श्री मांगीरबाबा व मालोबा-बालोबा यांची याञा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे स. पो. नि.  युवराज आठरे व ग्रामस्थांच्या बैठकीत झाला.
    सध्या दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी धार्मिक व इतर सर्व कार्यक्रमांना गर्दी करू नये असे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कालच्या बैठकीत गावची याञा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे बाहेरगावाहून येणार्या भाविकांनी याञेसाठी येऊ नये व गर्दी करू नये तसेच आपल्या घरीच राहून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
    यादिवशी केवळ पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी शासकीय नियमांचे पालन करून करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले.
  यावेळी सरपंच बबन करंडे, उपसरपंच प्रा.दिपक जाधव, मार्केट कमिटीचे मा.संचालक संजय शिंदे ,जिल्हापरिषदचे मा.सदस्य बाबासाहेब गायकवाड,तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल पठारे, मा.उपसरपंच भाऊसाहेब काळे,देहरे सैनिक अकॅडमीचे अध्यक्ष सुनिल बालवे, पोलिस पाटील चंद्रकांत खजिनदार सर्व ग्रामपंचायत सदस्य, व याञा कमिटीचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here