अवैधरित्या गौण खनिज उत्खननप्रकरणी जप्त केलेल्या वाहनांचा मंगळवारी होणार लिलाव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

अवैधरित्या गौण खनिज उत्खननप्रकरणी जप्त केलेल्या वाहनांचा मंगळवारी होणार लिलाव

 अवैधरित्या गौण खनिज उत्खननप्रकरणी जप्त केलेल्या वाहनांचा मंगळवारी होणार लिलाव


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करून वाहतूक करीत असताना अहमदनगर तालुक्यात पकडलेल्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ज्या वाहनांच्या मालकांनी दंडाची रक्कम शासन जमा केलेली नाही, त्यांच्या जप्त करण्यात आलेल्या वाहनांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 16 मार्च रोजी तहसील कार्यालय अहमदनगर येथे हा लिलाव होणार असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली आहे.
   वाहन मालकांनी दंडात्मक रक्कम न भरल्याने ही वाहने जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्याचे अधिपत्र नमुना नंबर 3 नुसार अटकावून ठेवण्यात आली असून या वाहनांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.
   लिलावात भाग घेणार्‍या व्यक्तींपैकी ज्याची बोली सर्वोच्च असेल त्या व्यक्तीची अनामत रक्कम सर्वोच्च बोलीच्या 25 टक्के रकमेमध्ये समाविष्ट करण्यात येईल. लिलावात भाग घेऊ इच्छिणार्‍या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज लिलाव होणार्‍या जंगम मालमत्तेची हातची किंमत अनामत रक्कम तसेच लीलावच्या अटी व शर्ती यासाठी तहसील कार्यालय अहमदनगर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जास्तीजास्त लोकांनी आणी संस्थानी या जाहीर लिलावात भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment