नगर शहर हे निधी गायाब करणारे बर्मुडा ट्रँगल : सुहास मुळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

नगर शहर हे निधी गायाब करणारे बर्मुडा ट्रँगल : सुहास मुळे

 मनपाच्या आर्थिक अर्थसंकल्पात 10 अत्यंत महत्वाच्या सुविधांसाठी निधीची तरतूद करण्याची जागरूक नागरिक मंचची मागणी

नगर शहर हे निधी गायाब करणारे बर्मुडा ट्रँगल : सुहास मुळे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः आज पर्यंत नगरकर फक्त विकास निधीच्या कोटीच्या कोटी उड्डाणेच ऐकत आले आहेत. मात्र विकास प्रत्यक्षात नसून कागदावरच झाला आहे का ? हा प्रचंड निधी जातो कुठे कुठे? हे आता बर्मुडा ट्रँगल सारखे रहस्य झाले आहे. बर्मुडा ट्रँगल मध्ये जसे मोठे मोठे विमान आणि जहाज गायब होतात तसेच नगर शहरात विकास निधीचे कोटीच्या कोटी रुपये गायब झाली आहेत. नगर या उध्वस्त शहरावर नजर मारली असता नेमके कुठे खर्च झाले हे साक्षात परमेश्वराला देखील शोधून काढता येणार नाही. त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही. महापालिकेच्या येत्या अर्थसंकल्पात जर 10 अत्यंत महत्वाच्या नागरी सुविधांसाठी निधीची तातडीने तरतूद मनापा प्रशासनाने करावी. महत्वाचे म्हणजे नुसत्या कागदोपत्री तरतुदी व अहवाल अपेक्षित नसून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी अपेक्षित आहे. जर या अर्थ संकल्पात निधीची तरतूद झाली नाही तर संपूर्ण शहरभर कर न भरण्याचे सविनय कायदेभंग व असहकार आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी दिला.
   मनपाच्या येत्या आर्थिक संकल्पात विविध महत्वाच्या नागरी सुविधांसाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी करत जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून गांधीगिरी करत आयुक्त व महापौर यांना मागण्याचे निवेदन देवून मनपाच्या दारात मागण्याचा फ्लेस्क लावून घोषणा देण्यात आल्या. यावेळी सचिव कैलास दळवी, सुरेखा सांगळे, दत्ता गायकवाड, राजेंद्र पडोळे, सुनील कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, नंदकुमार भालेराव, वैभव पालवे आदि उपस्थित होते.
   यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात पुढील 10 महत्वाच्या कामांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. भुयारी गटार योजना व अमृत पाणीपुरवठा योजना याविषयी दर्जा, खर्च,व कालावधी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, वर्षानुवर्षे बंद असलेले ट्रॅफिक सिग्नल चालू करण्या विषयी अंदाज पत्रक तरतूद जाहीर करावी, बहुतांश ठिकाणी होणारा दूषित पाणीपुरवठा आणि अस्वच्छ टाक्यांसाठी आर्थिक तरतूद जाहीर करावी, नेहरू मार्केट, प्रोफेसर कॉलनी मार्केट, काउंसिल हॉल व शहरातील 2000 अनाधिकृत पत्र्याची दुकाने याविषयी श्वेतपत्रिका जाहीर करावी, शहरात एकही अधिकृत भाजी मार्केट किंवा उद्यान शिल्लक नाही, सर्व वॉर्डामध्ये लेआउट मधील रिझर्वेशन भूखंड व सद्यस्थिती जाहीर करावी, सीना नदी अतिक्रमण व सुशोभीकरण योजना याविषयी अहवाल जाहीर करावा, शहरातील पथदिवे दुरुस्ती आणि विज बिल वाचवण्यासाठी आधुनिक उपाय योजना, उघड्या डीपी, दुरुस्ती याविषयी आर्थिक तरतूद जाहीर करावी, प्रत्येक पावसाळ्यात तुडुंब भरणारे गावठाण, नाले साफसफाई व गटारी या विषयी आर्थिक तरतूद जाहीर करावी, दररोज पहाटे शहरांमध्ये रस्त्याने वाहणारे पाणी, लिकेज त्यांचा बंदोबस्त, नळांना तोट्या लावणे,  रेग्युलर टाक्या साफ करणे याविषयी आर्थिक तरतूद जाहीर कराव, मनपा अधिकृत आरोग्य केंद्रे व हॉस्पिटल यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री व पेंडींग कर्मचारी भरती व सुसज्ज इमारत याविषयी तरतुदी अहवाल जाहीर करावा.

No comments:

Post a Comment