विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आ. जगताप

 केडगाव येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आ. जगताप

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाबरोबरच शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करावी. मिळालेल्या पदाचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी करावा. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असून ते सरकारच्या माध्यमातून सोडवू. विद्यार्थ्यांनी संघटित होऊन सामाजिक कार्य करण्याकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
   केडगाव येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करुन पत्राचे वाटप करताना आ. संग्राम जगताप, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक संजय चोपडा, संभाजी पवार, साहेबान जहागीरदार, अमित खामकर, राजेश भालेराव, लंकेश चितळकर, शुभम बंब, राहुल नेटके संजय तवले, क्रषिकेश बागल सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस केडगाव विभाग कार्यकारिणी जाहीर आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते केडगाव विभागाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पद नियुक्त्या शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी जाहीर केले. वैभव ढाकणे म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांनी शहर विकासाच्या प्रशश्नाबरोबरच विद्यार्थ्यांचे तसेच युवकांचे प्रश्न मार्गी लावत असल्यामुळे युवकांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वाढत आहे. तसेच शहरांमधील विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नावर आ. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच खंबीरपणे उभी राहिली आहे. याच कारणाने केडगाव उपनगरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारा मोठा युवावर्ग तयार झाला आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या केडगाव विभागाच्या विद्यार्थी संघटनेच्या पदनियुक्ती जाहीर झाल्या. केडगाव विभाग प्रमुखपदी तुका कोतकर तसेच प्रभाग क्रमांक 16 च्या प्रमुखपदी अतुल लवांडे, प्रभाग 17 च्या प्रमुखपदी क्रषिकेश गवळी व न्यू आर्ट्स कॉलेज विद्यार्थी प्रतिनिधी विशाल सकट यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक संजय चोपडा, संभाजी पवार, साहेबान जहागीरदार, अमित खामकर, राजेश भालेराव, लंकेश चितळकर, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here