सुपा, तोफखाना, कोतवाली पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

सुपा, तोफखाना, कोतवाली पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद..

 सुपा, तोफखाना, कोतवाली पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद..

संघटित गुन्हेगारी टोळीस मोक्का !

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः घातक शस्त्रांसह दरोडा टाकणे,दरोड्याची तयारी करणे, जबरीने चोरी करणे, रस्ता अडवून दरोडा टाकणे, शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणे असे गंभीर गुन्हे सुपा, तोफखाना, कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखलअसणारा नयन राजेंद्र तांदळे वय 25 वर्षे रा. भिस्तबाग चौक हा टोळी प्रमुख व त्याचे चार साथीदारांच्या विरोधात लावण्यात आलेल्या मोक्काचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांनी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
   पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलित करून ज्या संघटित गुन्हेगारी टोळ्या आहेत. यांचे विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्याअनुषंगाने सुपा पोलिस स्टेशन मध्ये 25 डिसेंबर रोजी गुन्हा घडला होता. हा गुन्हा नयन राजेंद्र तांदळे वय 25 वर्ष भिस्तबाग चौक अहमदनगर व त्याचे टोळीने संघटितपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या टोळी विरुद्ध मोक्का कायदा अन्वये कारवाई करणे करिता पोलीस स्टेशन मार्फत मोक्काचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
    या प्रस्तावास 18 मार्च 2019 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांची मंजूरी मिळाली असून होळीतील टोळी प्रमुख नयन राजेंद्र तांदळे वय 25 रा. भिस्तबाग चौक अहमदनगर , विठ्ठल भाऊसाहेब साळवे वय 27 वर्षे रा.झापवाडी ता. नेवासा, अक्षय बाबासाहेब ठोंबरे वय 23 वर्ष रा. प्रेमदान सावेडी ,शाहुल अशोक पवार वय 31 वर्षे रा. सुपा ता. पारनेर, अमोल पोटे वय 28 वर्षे रा. सुपा ता. पारनेर या टोळीतील सदस्यांवरील मोक्का प्रस्ताव मंजूर मिळाली आहे. या टोळी विरुद्ध सुपा, तोफखाना, कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.
   अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस स्टेशन, सुपा पोलिस स्टेशन, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत घातक शस्त्रासह दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी करणे, जबरी चोरी करणे,रस्ता अडवून दरोडा टाकणे ,शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणे,चोरी करणे असे दाखल असलेले गुन्हे टोळीने संघटितपणे केलेले आहेत. या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अन्वये कारवाईस विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांची मंजुरी मिळाल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग जिल्हा अहमदनगर करत आहे.

No comments:

Post a Comment