जिल्ह्यात आज 857 नवीन कोरोणा रुग्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

जिल्ह्यात आज 857 नवीन कोरोणा रुग्ण

 जिल्ह्यात आज  857 नवीन कोरोणा रुग्ण



नगरी दवंडी


अहमदनगर जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने चिंताही वाढली आहे. गेल्या २४ तासांत ८५७ नव्या बाधितांची नोंद झाली. यामध्ये नगर शहरातील २९१ रुग्णांचा समावेश आहे.ग्रामीण भागात राहात्याची स्थिती वाईट असून तेथे १११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता चार हजारपर्यंत पोहोचली आहे.


गेल्या 24 तासांमध्ये 857 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. नगर शहरातील बाधितांचा आकडा तीनशे जवळ पाेहाेचला आहे. नगर शहरात गेल्या 24 तासांमध्ये 291 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.वाढत्या बाधितांमुळे उपचारार्थींचा आकडा चार हजारच्या उंबरठ्याजवळ पाेहाेचला. गेल्या 24 तासांमध्ये वाढलेल्या उच्चांकी आकड्यामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण हे अहमदनगर शहरापाठाेपाठ राहाता तालुक्यात आहेत.

अहमदनगर शहर 291, राहाता 111, संगमनेर 84, काेपरगाव 76, श्रीरामपूर 52, जामखेड 37, नगर तालुका 34, नेवासे 27, राहुरी 26, पारनेर 21, पाथर्डी 19, कर्जत 18, शेवगाव 15, भिंगार शहर 15,अकाेले 14, श्रीगाेंदे 06, इतर जिल्ह्यातील 11 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रयाेगशाळेनुसार 319, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 475 आणि रॅपिड चाचणीनुसार 63 जणांना काेराेना संसर्ग झाला आहे.

दरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घाईघाईने घेतला जाणार नाही, त्यापेक्षा उपाययोजना आणखी कडक करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment