कल्याण रोड पाणीप्रश्नावरून राडा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

कल्याण रोड पाणीप्रश्नावरून राडा!

 कल्याण रोड पाणीप्रश्नावरून राडा!

केडगावचे पाणी कमी न करता केडगाव लाईन वरून आम्हाला पाणी द्या- नळकांडे, शिंदे.
कल्याणरोडसाठी दुसरी लाईन टाका; केडगावच्या लाईनचे नाव काढू नका- मनोज कोतकर.

“नगर कल्याण रोडवरील पाणी प्रश्न खुप जिव्हाळ्याचा विषय आहे चखऊउ कडून केडगाव बायपास वरुण जाणार्‍या जलवाहिनीतुन कल्याण रोडवरील रहिवाशांना पाणी पुरवठा करावा अशी आमची मागणी आहे. कल्याणरोड परीसरातील पाणी प्रश्नासाठी आम्ही प्रशासनाशी कोणतीही तडजोड करणार नाही. आम्ही कल्याण रोडवरील नागरिकांना नियमितपणे पाणी पुरवठा केल्याशिवाय गप्पा बसणार नाही. परिसरातील नागरीकानां त्याच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा करत राहणार. आमचे वैयक्तिक मतभेद कोणाशीही नाही”
- शाम नळकांडे, नगरसेवक शिवसेना.



नगरी दवंडी/प्रि
तीनिधी
अहमदनगर ः “कल्याण रोड परिसराला वर्षातून 40 ते 50 दिवस पाणी मिळते. या परिसरातील नागरिक पाणीपट्टी भरत असताना त्यांना पाणी देता येत नसेल तर पाणीपट्टी माफ करून टाका. या परिसरातील पाणीप्रश्नासाठी आम्ही भांडत आहोत. केडगावला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीतून केडगावचे पाणी कमी न करता आम्हास पाणी मिळावे” असा प्रस्ताव काल स्थायीच्या अंदाजपत्रकीय चर्चेदरम्यान नगरसेवक शाम नळकांडे व सचिन शिंदे यांनी मांडला असता नगरसेवक मनोज कोतकर यांनी त्यास विरोध केला. या पाणी प्रश्नावरून ‘स्थायी’च्या बैठकीत मोठा राडा झाला. “कल्याण रोडसाठी स्वतंत्र लाईन टाका. केडगावच्या लाईनचं नाव काढू नका” अशा शब्दात कोतकर यांनी विरोध दर्शविला. वाद वाढल्यानंतर स्थायीचे सभापती अविनाश घुलेेंनं सह इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करून नळकांडे, शिंदे, कोतकर या तिघांना शांत केले.काल 2021-22 च्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली. या चर्चेदरम्यान कल्याण रोड मधील शिवसेना नगरसेवक शाम नळकांडे व सचिन शिंदे यांनी कल्याण रोड परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केडगाव जलवाहिनीतून पाणी देण्याचा प्रस्ताव मांडला. दोन तीन दिवसापूर्वी स्थायीचे सभापती अविनाश घुले यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली होती. या बैठकीत कल्याण रोड परिसरातील पाणी प्रश्नावर तोडगा म्हणून केडगावला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीवर जादा पाणी उपलब्ध करून व केडगावला पाणीपुरवठा ज्या दिवशी बंद असेल त्या दिवशी पाणी कल्याण रोड परिसराला देण्याचा विषय चर्चेत पुढे आला होता. यावर पाणी उपलब्धता व वस्तुनिष्ठ अभ्यास करून निर्णय घेण्याचे ठरले होते. कालच्या अर्थसंकल्पिय सभेदरम्यान मनोज कोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित करून केडगाव जलवाहिनीतून कल्याण रोडला पाणी देण्यास विरोध दर्शविला. यावरून शिवसेना नगरसेवक शाम नळकांडे व सचिन शिंदे संतप्त झाले व खडाजंगी सुरू झाली. सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, सागर बोरुडे, प्रशांत गायकवाड यांनी मध्यस्थी करून हा वाद संपविण्याचा प्रयत्न केला. उपायुक्त यशवंत डांगे यांनीही तिघांना शांत करून या वादावर पडदा पाडला.

No comments:

Post a Comment