के. जी. महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

के. जी. महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

 के. जी. महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः के.जी. कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या डॉ. स्वाती मुनोत यांनी मराठी भाषेचा वापर अधिकाधिक वाढविण्यासाठी विध्यार्थ्यांनी काय करावे हे सांगून मराठी भाषेच्या विध्यार्थ्यांना कोणकोणत्या क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत हे सांगितले. संस्थेचे विश्वस्त श्री. किशोर मुनोत यांनी मराठी भाषा किती समृध्द आहे मराठीत उच्च दर्जाचे साहित्य उपलब्ध असून ते वाचावे हे सांगितले तर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा कीर्तने यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यावर प्रकाश टाकून मराठी भाषा उंचीवर नेण्याचे कार्य साहित्यिकांनी केले असे मत व्यक्त केले.
   या प्रसंगी प्रा. डॉ. प्रशांत खोपटीकर, प्रा. स्नेहल बोरावके, प्रा. वीरेंद्र पाटील, प्रा. योगेश चाकोते, श्री.संतोष मुनोत ,श्री. किशोर चोपडा,  मनोज महंन्काळे , सविता केदारे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. आनंदमणी त्रिपाठी यांनी केले.

No comments:

Post a Comment