यशस्वी होण्यासाठी परिस्थिती अडथळा ठरू शकत नाहीः प्रा. खेर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

यशस्वी होण्यासाठी परिस्थिती अडथळा ठरू शकत नाहीः प्रा. खेर

 यशस्वी होण्यासाठी परिस्थिती अडथळा ठरू शकत नाहीः प्रा. खेर

सीताराम सारडा विद्यालयात विज्ञान दिन साजरा

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यात आपली आर्थिक परिस्थिती अडथळा ठरु शकत नाही. विज्ञानवाद माणसाला हुशार बनवित असून, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्राचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. वैज्ञानिक व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेतली पाहिजे. कारण अनेक वैज्ञानिकांनी प्रतिकुल परिस्थितीत शोध लावले आहेत. या शोधांचा जगच्या कल्याणासाठी मोठा उपयोग झाला आहे. भारताने वैज्ञानिक क्षेत्रात जगात मोठे यश मिळविले आहे. यामध्ये अनेक शास्त्रज्ञांचा वाटा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगळे कलागुण असतात त्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा.मकरंद खेर यांनी केले.
   हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन प्रा.मकरंद खेर बोलत होते. प्रारंभी डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन अनोख्या पद्धतीने टाळी वाजवून बल्ब प्रकाशित करुन करण्यात आले. याप्रसंगी सौ.शुभदा खेर, चि.आदित्य देवचक्के, मुख्याध्यापक संजय मुदगल, पर्यवेक्षिका सौ.अलका भालेकर आदि उपस्थित होते.
   याप्रसंगी आदित्य देवचक्के म्हणाले, गरजेतून विविध शोध लागतात, यासाठी विद्यार्थ्यांनी चिकित्सकदृष्टी ठेवून अभ्यास केला पाहिजे.  ध्येय निश्चित केल्याय यश निश्चित मिळत असते. आपल्यातील चांगल्या क्षमतांचा उपयोग केल्यास यश मिळत असते. असे सांगून आपल्या अमेरिका प्रवासाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
   मुख्याध्यापक संजय मुदगल व पर्यवेक्षिका अलका भालेकर यांनी विज्ञान दिनाबाबतची माहिती दिली.    यावेळी विनोद देसाई, सौ.सुजाता खामकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक वृषाली जोशी यांनी केले तर सौ.दिपाली लगड यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला. श्रीमती क्रांती मुंदानकर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment