अनुदानप्राप्त खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

अनुदानप्राप्त खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न

 अनुदानप्राप्त खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः कोरोना संकटकाळात प्रत्यक्ष सभा घेण्यास परवानगी नसल्याने अनुदानप्राप्त खाजगी प्राथमिक शिक्षक व सेवकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन संजय चौरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन संपन्न झाली.
   सुरुवातीस आर्थिक वर्षात मृत पावलेल्या सभासद, साहित्यिक, लेखक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच विविध स्पर्धा व परीक्षांत यश संपादन करणार्या सभासद व पाल्यांचे अभिनंदन करण्यात आले.
   पतसंस्थेचे मानद सचिव अजय महाजन यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर सभेतील विषय पत्रिकेवरील विषयांवर विचारविनिमय होऊन सभासदांच्या मंजुरीने सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभासदांच्या मागणीनुसार जामिन कर्जाची मर्यादा 10 लाखांपर्यंत करण्यात आली, तसेच कर्जव्याज 10.20 वरून 8.40 करण्यात आले.
   पतसंस्थेचे सभासद चौगुले, रंगा, सौ. शुळ यांनी ऑनलाईन सभेचे उत्कृष्ट नियोजन केले. सभासदांनी पतसंस्थेच्या कामाबद्दल विशेष कौतुक केले. सर्व संचालक, पतसंस्थेचे व्यवस्थापक सुरेश कुलकर्णी यांच्या सहकार्यातून सचिव अजय महाजन यांनी ऑनलाईन सभेचे उत्कृष्ट नियोजन केले. सभेस संस्थेचे चेअरमन संजय चौरे, व्हा. चेअरमन सौ. विद्या दगडे, खजिनदार श्रीमती मीरा वाव्हळ, संचालक चंद्रशेखर देशपांडे, शरद देवढे, श्रीनिवास मुत्याल, बाळासाहेब म्हस्के, गऊराम कदम, भगवान जाधव, तिलोत्तमा क्षीरसागर आदी उपस्थित होते. चेअरमन संजय चौरे यांनी आभार व्यक्त करून सभेची सांगता झाली.

No comments:

Post a Comment