निमगाव वाघात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

निमगाव वाघात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय

 निमगाव वाघात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय

नवनाथ विद्यालय, डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः उन्हाळ्यात पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून शहरालगत असलेल्या निमगाव वाघात (ता. नगर) झाडांवर पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय करण्यात आली आहे. पक्ष्यांसाठी मदतीचा हात पुढे करुन नवनाथ विद्यालय, डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविला.
   दिवसं-दिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना पक्षी पाण्यासाठी व अन्नासाठी भटकंती करीत आहे. गावातील नवनाथ विद्यालयात असलेल्या झाडांवर धान्य व पाण्याची भांडी टांगून पक्ष्यांची सोय करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, सचिव भागचंद जाधव, मुख्यध्यापक किसन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, तुकाराम खळदकर, प्रतिभा डोंगरे, मंगेश जाधव, लहानबा जाधव, प्रियंका डोंगरे आदींसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.  
   मागील तीन वर्षापुर्वी दुष्काळात पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागला होता. ही जाणीव ठेऊन संस्थेच्या वतीने दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात येते. रिकाम्या पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या व गाडगे झाडाला दोरीने लटकवून गावात पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची सोय करण्यात आली आहे. पक्षी हे नैसर्गिक चक्राचा घटक असून, त्यांना जगविणे ही मनुष्याची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांना देखील घराच्या गच्छीवर व गॅलरीत पक्ष्यांच्या पाण्याची व धान्याची व्यवस्था करण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment