श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनतर्फे जागतिक महिला दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनतर्फे जागतिक महिला दिन साजरा

 श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनतर्फे जागतिक महिला दिन साजरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जागतिक महिला दिनानिमित्त श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या सेठ नंदलाल धूत आणि मोहनलाल रामअवतार मानधना कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला. मार्केट यार्ड येथील महात्मा फुले चौकात महिला दिनाच्या शुभेच्छा देणारी सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती.
   यावेळी प्राचार्या राधिका जेऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी गटागटाने सारसनगर, चिपाडे मळा, मार्केटयार्ड परिसरातील गृहिणींचा गुलाबपुष्प देवून सत्कार केला. यावेळी नोकरदार महिला, भाजीवाल्या, चहाटपरीचालक अशा छोट्या व्यावसायिक महिलांचाही सन्मान करण्यात आला. प्राचार्या जेऊरकर शुभेच्छा देताना म्हणाल्या की, आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने उच्च स्थानावर पोहचत आपले अस्तित्त्व सिध्द केले आहे. असे असले तरी गृहिणी म्हणूनही ती समर्थपणे कर्तव्य बजावते. नोकरदार महिलांप्रमाणेच  छोटे व्यवसाय करणार्या महिलाही आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. या सर्वांचे महत्त्व अनन्यसाधारण असून यंदा करोना प्रतिबंध नियमांचे पालन करून अशा महिलांचा सन्मान करताना विशेष आनंद मिळाला.शिक्षक अजित लोळगे यांनीही आपल्या मनोगतात सर्व महिला शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या.
   सदर उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष नंदकुमार झंवर व मोहनलाल मानधना, सचिव डॉ.शरद कोलते, सहसचिव राजेश झंवर, सदस्य बजरंग दरक यांनी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात प्राचार्या राधिका जेऊरकर, समन्वयक संपदा देशपांडे, सावित्री पुजारी, अंजना पंडित सहभागी झाल्या होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here