डेल्को कंपनीचे शटर तोडून चोरी करणारा गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

डेल्को कंपनीचे शटर तोडून चोरी करणारा गजाआड.

 डेल्को कंपनीचे शटर तोडून चोरी करणारा गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः येथील एमआयडीसी मधील डेल्को कंपनीचे शेटर तोडून 2 लाख 6 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल चोरणारा चोरटा जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. सिद्धांत रावसाहेब शिंदे (वय 20, रा. निंबळक ता. जि अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
   याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 28 फेब्रुवारीला रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कंपनीत पाठीमागील बाजूचे शेटर तोडून आतील 2 लाख 6 हजार 325 रुपये किमतीचे तांब्याचे बुशेस व तांब्याच्या वायडिंग वायर चोरून नेली, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील चोरटा निंबळक शिवारात येणार असल्याची माहिती सपोनि वाय.यु.आठरे यांना मिळाली होती. श्री आठरे यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी पोलिस पथकाने सापळा लावून त्याला पकडण्यात आले. आरोपी शिंदे याने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली असून गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि वाय. यु. आठरे यांच्या सूचनेनुसार पोसई सदाशिव कणसे, पोना दाताळ, शाबीर शेख, समीर शेख, पांढरकर, पोशि शिंदे, देशमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment