महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे- नगरसेवक गणेश भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे- नगरसेवक गणेश भोसले

 पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मैलमिश्रीत, लालपाणी, प्राण्यांचे अवयव

महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे- नगरसेवक गणेश भोसले

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेची 900 एमएम सिमेंट पाईपलाईनद्वारे 1972 सालापासून सारसनगर, भोसले आखाडा, रेल्वेस्टेशन रोड, आगरकर मळा, कायनेटीक चौक, दौंड रोड, माणिक नगर, माळीवाडा, टिळक रोडसहीत 50 हजार कुटुंबाला वसंत टेकडीवरून या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गेल्या 20 दिवसांपासून या पाईपद्वारे खाटीक गल्लीतील लालपाणी, मैलमिश्रीत गटारीचे पाणी व प्राण्यांचे अवयव सीएसआरडी कॉलेज जवळील लिकेजमधून येत आहे. महापालिका अधिकार्‍यांना वारंवार सूचना देऊनही कुठलीही उपाययोजना व लिकेज दुरुस्तीचा प्रयत्नही केला नाही. मागील चार दिवसांपूर्वी आमच्या भागाला
   पाणीपुरवठा न करण्याच्या सूचवा वॉलमनला दिल्यानंतर महापालिकेने लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी असे निदर्शनास आले की, महापालिकेचा पुनहा एकदा अजब कारभार डोळ्यासमोर आला की 900 एमएम पिण्याच्या पाईपलाईनवरुन ड्रेनेजची पाईपलाईन टाकण्याला सुरूवात झाली. संपूर्ण भारतात असे काम कुठेही झाले नाही, परंतु नगरमध्ये ते होत आहे. ही ड्रेनेजची पाईपलाईन दुसर्‍या बाजुने शिप्ट करण्याच्या सूचना दिल्या आहे. अन्यथा आंदोलन करीन. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन साथीचे आजार उद्भवत आहेत. महापालिका ही नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. पाणीपुरवठा विभाग
हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. परंतु पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते हे फक्त आयुक्त, महापौर व ठेकेदारांपुरतेच काम करत असतात. कधीही ते फील्डवर्क वर नसतात. त्यांना सावलीच्या ठिकाणी खुर्ची टाकून काम करण्याची संधी द्या. अशा अधिकार्‍यांमुळे महापालिकेची बदनामी होत असते. महापालिकेचे कर्मचारी आपआपल्या परीने संपूर्ण शहरामध्ये काम करत असल्यामुळे पालिकेचा कारभार सुरळित आहे. अन्यथा अशा अधिकार्‍यांपासून कुठल्याही नागरिकांचे समाधान होत नाहीये. ते त्यांच्या फाईलींमध्येच गुंतलेले असतात. नागरिकांच्या जीवाशी कोणी खेळत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. दूषित पाण्याचा एवढा मोठा संवेदनशील विषय असतानाही झोपल्याचे सोंग हे अधिकार का घेतात. त्यांना नागरिकांच्या प्रश्नाची काळजी वाटत नाही का? या पुढील काळात असा अधिकार्‍यांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी माहिती नगरसेवक गणेश भोसले यांनी दिली.
    नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना सारसनगर भागात होणार्‍या मैलमिश्रीत पाण्याबाबतचे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मैलमिश्रित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पाण्यामुळे साथीचे आजार फैलावण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पाणी खराब येत असल्यामुळे नागरिकांना दुसर्‍या ठिकाणाहून पाणी आणण्याची वेळ आली आहे. अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रार करुनही याचे कुठलेही निवारण झाले नाही. उलट नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. किरकोळ प्रकारच्या तक्रारीचे निवारणही होत नाही. ही अत्यंत लाजीरवाणी व खेदजनक बाब आहे. तरी प्रभाग क्र. 14 मधील सारसननगर परिसरातील भेडसावणार्‍या मैलमिश्रीत पाण्याचा प्रश्न येत्या दोन दिवसात मार्गी न लागल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पूर्व सूचना न देता आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वखाली तीव्र स्वरुपाचे आंदोलन करुन महापालिकेमध्ये अधिकार्‍यांना मैलमिश्रित पाणी पाजले जाईल, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment