न्यायालयातील क्लार्कवर अत्याचाराचा, गुन्हा दाखल ! आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

न्यायालयातील क्लार्कवर अत्याचाराचा, गुन्हा दाखल ! आरोपी गजाआड.

 न्यायालयातील क्लार्कवर अत्याचाराचा, गुन्हा दाखल ! आरोपी गजाआड.

शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोट घेण्यास भाग पाडले...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पती-पत्नी मधील वाद न्यायालयाकडे येत असतात. अशीच एक शिक्षिका न्यायालयात पतीच्या विरोधात न्यायालयात येत असताना न्यायालया मधील क्लार्क राजेंद्र सोनवणे (रा.तपोवन रोड) याने “तू तुझ्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आपण लग्न करू” असे आमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद दिल्यानंतर तोफखाना पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने आरोपीस राहता येथून अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणा बद्दल मिळालेली माहिती अशी की फिर्यादी शिक्षिका आष्टी तालुक्यामध्ये एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. ती सध्या अहमदनगर मध्ये राहत आहे. त्याची काही दिवसापूर्वी आरोपी सोनवणे सोबत ओळख झाली होती फिर्यादी शिक्षिका आणि त्याच्या पतीचे न्यायालयात वाद सुरू होते फिर्यादी शिक्षिका आणि आरोपी सोनवणे याच काळादरम्यान त्यांचे ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले.
आरोपीने फिर्यादी शिक्षकेला आपल्या पती पासून घटस्फोट घेण्यास सांगितले तू तुझ्या पती पासून घटस्फोट घेतल्यानंतर आपण लग्न करू असे आरोपीने शिक्षिकाला सांगितले . त्यानंतर काही दिवस आरोपी आणि शिक्षिका एकत्र राहिले शिक्षिकेने पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी लग्नही केले. फिर्यादी शिक्षकेने आरोपी सोनवणेकडे कायदेशीर पद्धतीने लग्न करण्याची अट घातली दरम्यानच्या काळात आरोपीने त्याच्या आई-वडिलांना माहिती दिली आरोपीच्या आई-वडिलांनी फिर्यादी शिक्षकेला मारहाण केली.
नंतर फिर्यादी शिक्षिकेला आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी आपल्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यादीने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेढे करत आहे.

No comments:

Post a Comment