केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे पार्थिव अनंतात विलीन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे पार्थिव अनंतात विलीन

 केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे पार्थिव अनंतात विलीन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं काल (दि.17 रोजी) पहाटे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात कोरोनाने निधन झाले . त्यानंतर त्यांचे पार्थिव आज दुपारी 4 वाजता नगरला त्यांच्या निवास स्थानी आणण्यात आले. तेथून त्यांची अंतयात्रा काढण्यात आली सायंकाळी 6 च्या दरम्यान नगर च्या अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर दिलीप गांधी अमर रहे च्या घोषणात, भावपूर्ण वातावरणात   अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्ययात्रेच्यावेळी संपूर्ण रस्त्यात त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.दिलीप गांधी यांच्या निवासस्थाना पासून आनंदधाम,बंगाल चौक,दिलीप गांधी यांचे जुने निवास स्थान (चांद सुलतान शाळे जवळ), माणिक चौक, अर्बन बँक, कापड बाजार, तेली खुंट, नेता सुभाष चौक, गांधी मैदान येथील भाजप कार्यालय, पटवर्धन चौक, मार्गे निघालेल्या अंतयात्रेत संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, महापौर. बाबासाहेब वाकळे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, आदींसह भाजप चे शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद गंधे, खासदार सुजय विखेपाटील, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
दिलीप गांधी यांनी खासदार म्हणून 3 वेळा अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे दिल्लीत प्रतिनिधित्व केले. त्यात त्यांनी रेल्वे मंत्रालयातील अनेक प्रश्न मार्गी लावले.त्यात प्रामुख्याने नगर - मनमाड रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, परळी-बीड-कल्याण मार्गासाठी भरीव निधी आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. केडगाव पुणे कॉड लाईन चा प्रस्ताव मांडला त्याच्या सर्वे पपासून ते कॉड लाईन पूर्ण करण्यासाठी वेळो वेळी पाठ पुरावा केला त्यासाठी पुरेसा निधी आणला. केडगाव पुणे कॉड लाईन या मार्गावरून नगर-पुणे रेल्वे शटल सेवा सुरु करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. यासशिवाय दौंड मनमाड या रेल्वे मार्गाचे इलेक्टरीफिकेशन तसेच नगर रेल्वे स्थानकावर सरकता जिना (एक्सकेव्हेटर) हा त्यांच्याच काळात झाला या व्यतिरिक्त नगर च्या रेलव्ह स्थानकाला संपूर्ण देशातून स्वच्छतेसाठीचा तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. या व्यतिरिक्त नगरच्या उड्डाणपुलासाठी खासदार दिलीप गांधी यांनी मंजुरी आणून त्यांच्याच काळात एकदा या उड्डाण पुलाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. तर नगर मधील नाट्य संमेलन त्यांच्याच काळात आणि त्यांच्या कार्याध्यक्षतेखाली पार पडले. नगर दक्षिण मतदार संघाला खासदार निधी म्हणजे काय हे पहिल्यांदा समजले गांधींच्याच कारकिर्दीत.अशी भावना जनमाणसातून यावेळी व्यक्त होत होती.

No comments:

Post a Comment