राज्यात या जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

राज्यात या जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन

 राज्यात या जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊननगरी दवंडी

बीड :  राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मराठवाडा या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात बीड जिल्ह्यात लॉकडाऊन  लागू करण्यात आला आहे. 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. 

कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. आता जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात कडक निर्बंध असणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. तसेच सर्व खासगी कार्यालयेही बंद राहणार आहेत. मंगल कार्यालय बंद राहतील. स्वागत समारंभ करता येणार नाहीत. हॉटेल बंद राहणार आहेत. तसे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत शिथिलता असणार आहे. यात किराणा दुकान, ठोक विक्रेते सुरू राहणार आहेत. दूध विक्री आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. 

दरम्यान, जिल्हा स्तरावर निर्बंध लादण्याच्या केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्या आहेत. तर राज्यव्यापी लॉकडाऊन लावता येणार नाही, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. गृहमंत्रालयाने मंगळवारी याबाबत नवी मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. नवी नियमावलीनुसार जिल्हा, उपजिल्हा, शहर आणि प्रभाग स्तरावर निर्बंध लादले जाऊ शकतात असे सूचित केले आहे. ही नियमावली 30 एप्रिलपर्यंत लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment