शिर नसलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

शिर नसलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले!

 शिर नसलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले!

पाण्याची बाटली व शर्टवरून पटली ओळख; 5 संशयितांकडे चौकशी सुरू
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः धूर्त नजर.. निष्णात अनुभव.. कर्तव्यदक्ष तेची जाण. धडकी भरवणारी खाकीवर्दी.. या सर्वांचा मिलाप म्हणजे पोलीस. शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटणे म्हणजे अत्यंत जिकीरीचं काम. सोमवार दि 8 रोजी श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे वळीतील 59 वर्षीय मृतदेह कोणाचा याचे गूढ पोलिसांनी उकलले ते घटनास्थळी सापडलेल्या एका पाण्याच्या बाटली वरून व अंगात असलेल्या शर्टवरील टेलरच्या स्टीकर वरून व पाण्याची बॉटलचे उत्पादन पुण्यातील त्यावर मृतदेह पुण्याचा हे निश्चित झालं. टेलर शोधला आणि टेलर च्या सांगण्यावरून मृतदेहाचं नाव पुढे आलं रमेश जाधव रा. कामज पुणे  
  या प्रकरणी पोलिसांनी बारामती येथील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सुरुवातीला बारामती येथून एका महिलेसह अन्य दोघे ताब्यात घेण्यात आले होते. काल रात्री मुंबई येथून आणखी दोन संशियतांना ताब्यात घेण्यात आले आहे. या पाचही संशयीत आरोपींकडे विचारपूस सुरू आहे. लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिस यंत्रणेनी व्यक्त केला.
   टाकळी कडेवळी येथे पुरण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासह खून करणारे आरोपी निष्पन्न करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. मृत रमेश जाधव यांचा कोयत्याने वार करत खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. संशयीत आरोपीने कोयत्याच्या एका वारात शीर धडावेगळं केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 8 फेब्रुवारी रोजी टाकळी कडेवळीत शिवारात शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान श्रीगोंदा पोलिसांसमोर होते. दोन दिवसांत मृताची ओळख पटवत संशयीत आरोपींपर्यत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्याची आरोपीने कबुली दिल्याची माहिती असून 31 जानेवारी रोजी सायंकाळी हा खून करण्यात आला.अतिशय नियोजनबद्ध हा खून करण्यात आला. जाधव यांच्यावर सुरुवातीला गावठी कट्ट्यामधून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला, मात्र कट्ट्यामध्ये गोळी अडकली गेल्याने दुसर्‍या एका आरोपीने हातातील कोयत्याने जोरदार वार करत मयत जाधव यांचे शीर धडावेगळे केले. अशी माहीती पोलीसांना मिळाली आहे.

No comments:

Post a Comment