श्रीगोंदा पोलिसांची कारवाई; सराईत मोबाईल चोर जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

श्रीगोंदा पोलिसांची कारवाई; सराईत मोबाईल चोर जेरबंद.

 श्रीगोंदा पोलिसांची कारवाई; सराईत मोबाईल चोर जेरबंद.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा पोलिसांनी वांगी, ता.करमाळा, जि.सोलापूर येथे जाऊन मोठया शिताफीने महेश मंगेश काळे वय 24वर्षे, रा.कुळधरण, ता.कर्जत या सराईत मोबाईल चोराला सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 19 मोबाईल हस्तगत केले. त्याच्या विरुध्द श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय सुरेश आळेकर यांचे वडील घराच्या टेरेसवर झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने 24 जानेवारी रोजी रात्री विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला. तसेच त्यांचे शेजारी राहणारे दिपक अनिल गणिशे यांचा देखील सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 31 जानेवारी रोजी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले याना गुप्त माहिती मिळाली की रेकोर्ड वरील सराईत गुन्हेगार महेश काळे याने मोबाईल चोरी केली असून तो करमाळा तालुक्यातील वांगी या ठिकाणी लपून बसला असून त्याच्यावर या आधी देखील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार स.पो.नि. दिलीप तेजनकर याना सूचना देत त्याचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस पथकाने वांगी या ठिकाणी सापळा रचून महेश मंगेश काळे वय 24 वर्षे, रा.कुळधरण, ता.कर्जत या सराईत मोबाईल चोराला सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 19 मोबाईल हस्तगत करत न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली. सदरची कारवाई श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि दिलीप तेजनकर, पो.हे.कॉ.अंकुश ढवळे,प्रकाश मांडगे, दादा टाके, किरण बोर्‍हाडे, संजय काळे, गोकुळ इंगवले तसेच सायबर सेलचे पो.कॉ.प्रशांत राठोड, नितीन शिंदे यांनी केली. तसेच पुढील तपास पो.ना.भारत खारतोडे व पो.कॉ.नामदेव सगर हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment