पोलीस कर्मचारी व कुटुंबियांसाठी डॉ. पानसरे चेस्ट क्लिनिकच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

पोलीस कर्मचारी व कुटुंबियांसाठी डॉ. पानसरे चेस्ट क्लिनिकच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

 पोलीस कर्मचारी व कुटुंबियांसाठी डॉ. पानसरे चेस्ट क्लिनिकच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
सिव्हील हडको येथे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सहकार्याने व डॉ. पानसरे  (छाती विकार तज्ञ) टेस्ट क्लिनिकच्या  वतीने  अहमदनगर शहरातील  पोलीस विभागातील  व त्यांच्या कुटुंबीयांसाठी  मोफत आरोग्य तपासणी  शिबिराचे आयोजन  1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी  रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत  डॉक्टर पानसरे  चेस्ट क्लिनिक येथे करण्यात  आले आहे.
    या क्लिनिक मध्ये जुनाट वारंवार खोकला, दमा, बालदमा, जुनाट दमा, सतत सर्दी, श्वसन मार्गाची अ‍ॅलर्जी, छातीत कफ होणे, छातीत घरघर/ शिट्टीसारखा आवाज येणे, क्षयरोग(टी.बी.), न्यूमोनिया, कॅन्सर, छातीमध्ये पाणी होणे किंवा गाठ होणे, झोपेमधील श्वसनाचे आजार घोरणे आशा विविध आजारांवर योग्य उपचार तसेच दमा रोग निदान तपासणी व दमा तिव्रता मापन तपासणी, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस व श्वसन मार्गाची तपासणी केली जाणार आहे. पोस्ट कोविड उपचार पण याठिकाणी उपलब्ध आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉक्टर सचिन पानसरे यांनी केले आहे. संपर्क साधण्यासाठी -7741052225 या मोबाईल क्रमांकावर फोन करावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here