सभापतींनी सोडविली ग्रामीण रुग्णालयाच्या पाण्याची समस्या ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

सभापतींनी सोडविली ग्रामीण रुग्णालयाच्या पाण्याची समस्या !

 सभापतींनी सोडविली ग्रामीण रुग्णालयाच्या पाण्याची समस्या !

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालय परिसरात सरकारी दवाखाण्याचा हातपंप गेल्या अनेक वर्षांपासून त्याला पाणी असतांनाही बंद अवस्थेत असल्याने पाण्यावाचून रुग्णांचे प्रचंड हाल होत होते.याबाबत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ मोहसिन बागवान,दत्ता दरंदले यांनी ही समस्या पञकार राजेंद्र वाघमारे यांना सांगितली पञकार वाघमारे यांनी हातपंप दुरुस्त करण्याची मागणी नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे यांना करताच त्यांनी तातडीने पंचायत समितीच्या हातपंप यांञिकी कामगारांना पाठवून हातपंप दुरुस्त केला यामुळे रुग्णांचे पाण्यावाचून हाल थांबून रुग्णांनी हातपंप दुरुस्ती केल्यामुळे मोठा आनंद व्यक्त केला.
       येथील ग्रामिण रुग्णालय परिसरात असलेल्या हातपंपाला भर उन्हाळ्यातही पाण्याची कमतरता जाणवत नाही तो ना - दुरुस्त असल्यामुळे ग्रामिण रुग्णालय प्रशासनाने जीवन प्राधिकरण योजनेचे पाणी घेतलेले होते माञ परिसरातील कामे सुरु असल्याने ही पाईप लाईन फुटल्याने रुग्णांचे मोठे हाल होत होते तर सरकारी दवाखाण्यातील पंपाला मोठ्या प्रमाणात पाणी असतांनाही तो बंद असल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत होते माञ नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे यांनी तातडीने दखल घेवून हातपंप दुरुस्ती केल्यामुळे पंचायत समिती विभागातील हातपंप यांञिकी विभागावर रुग्णांचा अभिनंदनाचा वर्षाव होत असून ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक मोहसिन बागवान यांनी हातपंप दुरुस्ती कामगार बजरंग जाधव व महादेव खंडागळे यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment