ज्वारीच पीक मोठ्या कष्टाने वाढवले पण दुसर्‍यानेच मारला डल्ला ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

ज्वारीच पीक मोठ्या कष्टाने वाढवले पण दुसर्‍यानेच मारला डल्ला !

 ज्वारीच पीक मोठ्या कष्टाने वाढवले पण दुसर्‍यानेच मारला डल्ला !

वयोवृद्ध शेतकरी कदम यांची कैफियत !
नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः सातबारा उतारा आमचा, कोर्ट आदेशही आमच्या बाजूने लागला, आम्ही शेतात ज्वारी पेरली, माञ सोंगणी   दादागिरीने दुसरेच 10- 12 जण करत असल्याने आम्ही नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेलो पोलिसांनी ज्वारी दुसरेच सवंगणी करतांना तर रोखले नाहीच उलट आम्हीच न्यायासाठी एक दिवसभर पोलिस ठाण्यात बसून राहीलो तरी न्याय मिळत नसल्याने दाद कोणाकडे मागायची असा सवाल खुणेगांव (ता.नेवासा) येथील शेतकरी दिगंबर हरीभाऊ कदम यांनी व्यक्त केली.
   शेती आमची,न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने लागला मग शेतात ज्वारी आम्ही पेरली अन् दुसरेच लोक तीची सोंगणी  करत असल्याने तक्रार देण्यासाठी मी व माझा मुलगा नेवासा पोलिस ठाण्यात गेलो माञ मला दिवसभर फिर्याद घेतो बाबा,समोरचे बोलवून घेवू असे म्हणून मलाच पोलिस ठाण्यात बसवून ठेवले माञ दुसरे लोक दिवसभर ज्वारी काढण्याचे काम सुरु ठेवल्याने पोलिस कधी खर्‍या गोष्टीची सत्यता पडताळुन न्याय देणार असा खडा सवाल वयोवृद्ध शेतकरी कदम यांनी केला आहे.याबाबत मी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी माझ्यावर झालेल्या अन्यायाप्रकरणी कैफियत मांडणार असून न्याय न मिळाल्यास नेवासा पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे कदम या शेतकर्‍याने आपली कहानी सांगतांना व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here