राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची शनिवारी वार्षिक बैठक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची शनिवारी वार्षिक बैठक

 राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची शनिवारी वार्षिक बैठक

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर - राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अहमदनगर विभागाची टिळक रोड येथील  श्रमिक कार्यालयात शनिवार दि.20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेची सध्य परिस्थिती व विविध प्रश्नावर चर्चा होणार असून संघटनेचे पदाधिकारी व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष बलभिम कुबडे, गोरख बेळगे, अर्जुन बकरे, विठ्ठल देवकर आदींनी आवाहन केले आहे.  
दि.11 मार्च 2020 रोजी संघटनेची वार्षिक बैठक पार पडल्यानंतर कोरोना महामारीमुळे संघटनेचे कामकाज होऊ शकले नाही. कोरोनाचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर झाल्याने संघटनेचे व सेवानिवृत्त कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहिल्याने नाराजी दिसून येत आहे. कोरोनाचे प्रादुर्भाव कमी होत असल्याने नियमांचे पालन करुन या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस केंद्रीय कार्याध्यक्ष सुधाकरराव गुजराती (नाशिक) हे मार्गदर्शन करणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाचे आनंदराव वायकर उपस्थित राहणार आहेत. ज्यांची शिल्लक रकमेच्या रजेबाबत व पेन्शन चालू न झालेल्या प्रश्नावर विभागीय कार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे पुढील दिशा ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. ज्यांचे प्रश्न सुटले नाही त्यांनी या बैठकीत उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment