नगर तालुक्यात कोरोनाची सेकंड इनिंग सुरु ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

नगर तालुक्यात कोरोनाची सेकंड इनिंग सुरु !

 नगर तालुक्यात कोरोनाची सेकंड इनिंग सुरु !

सध्या पन्नास रुग्ण सक्रिय, तर रोज 7 ते 8 रूग्णांची भर


नगरी दवंडी/अविनाश निमसे
अहमदनगर ः नगर तालुक्यात कोरोनाची सेकंड इनिंग सुरू झाली असुन दररोज सात ते आठ रुग्णांची भर पडत आहे. तालुक्यातील वाळकी, जेऊर, देहरे, विळद आदी गावांमध्ये  कोरोना   रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.  तालुक्यात आतापर्यत 3 हजार 614 रूग्ण झाले असुन मागील आठवड्यात तर रोजची रुग्ण संख्या 15 पर्यत गेली होती.   सध्या तालुक्यात 50 सक्रिय रूग्ण आहेत .
नगर तालुक्यात कोरोनाची परिस्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून  प्रशासनाबरोबरच सर्वसामान्यांची ही चिंता वाढली आहे.  
दरम्यान सध्याचे लग्न समारंभ पाहाता  लोकांना कोरोनाचा विसर पडलाय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. लग्न समारंभातून हजारो लोक कोणत्याही सुरक्षेशिवाय सहभागी होत असून यातून होणारी गर्दी कोरोनाला आमंत्रण देत आहे.
तालुक्यातील माध्यमिक शाळा, गावोगावचे आठवडे बाजार, भाजी बाजार  सुरू झाले आहेत. यामुळे सोशल डिस्टेंस चा फज्जा उडत आहे. अनेकजण मास्क न वापरतात गावात फेरफटका मारतात. यामुळे कोरोनाची भिती आणखीनच वाढली आहे. आरोग्य विभागाकडून  कोरोना बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी नागरिकांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.
तालुक्यात रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर तालुक्यात कोव्हिड सेंटर सुरू करावे लागणार आहे. तालुका आरोग्य विभागाने जागेची शोधाशोध सुरू केली आहे. गावोगावी दवंडी व इतर माध्यमातून जनजागृती केली  जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ . ज्योती मांडगे यांनी सांगितले.

बधितांचा छुप्या पद्धतीने उपचार
कोरोना बाधित झाल्यानंतर अनेक जण अपराधीक भावनेने गुपचूप जाऊन खासगी हॉस्पिटल मध्ये छुप्या पद्धतीने उपचार घेत आहेत. त्यामुळे बाधित झालेल्यांचा  इतर व्यक्तींशी आलेल्या संपर्का बाबत सर्व काही अलबेल रहाते. यामुळेही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

...

दररोज सात ,आठ रुग्ण वाढत आहे . मागील आठवडयात जास्त संख्या होती. प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकांना सर्वे  करण्यास सांगितले आहे.जेथे लक्षणे आढळतील त्या रुग्णाना तपासणी करण्यास सांगीतले आहे. लॅब टेक्निशियन  मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी होणार आहे. तालुक्यात कोव्हीड सेंटर चालू करण्याच्या सूचना दिल्या असून यासाठी  जागेचा शोध चालू आहे.  रुग्णाला अडचण येणार नाही अशी तयारी आरोग्य विभागाने चालू केली आहे. नागरिकानी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. विना मास्क फिरू नये तसेच गर्दोचे ठिकाणी  जाण्यास टाळावे.   - डॉ. ज्योती मांडगे-गाडे (तालुका आरोग्य अधिकारी)

...

काही ठिकाणी राजकीय ’सहली’ही कारणीभूत
तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवडी दरम्यान अनेक गावातून राजकीय सहली गेल्या. सरपंच-उपसरपंच पद आपल्याच गटाला मिळावे यासाठी प्रत्येक गावातून आटोकाट प्रयत्न झाले. यातून साहलिंचे आयोजन करण्यात आले. सहली नंतर निवडी झाल्या. यानंतर नूतन पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेतल्या गेल्या. बाहेर गेलेल्या लोकांपैकी अनेक लोक यातून संसर्गीत झाले असल्याचे दहा बारा दिवसांनंतर उघड झाल्यानंतर या गावांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.

...

जेऊरचा बाजार बंद तर वाळकीत 12 रुग्ण
 जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणार्‍या 16 गावांमध्ये आज पर्यंत 390 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. चालू आठवड्यात नव्याने 7 रूग्ण आढळुन आले. त्यामुळे जेऊर गावचा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. नगर तालुक्यातील वाळकी येथे कोरोनाचे 12 रुग्ण आढळले आहेत. वाळकी परिसरात  दुसर्‍यांदा कोरोनाचा शिरकाव होताना दिसत आला आहे.

No comments:

Post a Comment