घोडेगावच्या उपसरपंचपदी यशवंत येळवंडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 26, 2021

घोडेगावच्या उपसरपंचपदी यशवंत येळवंडे

 घोडेगावच्या उपसरपंचपदी यशवंत येळवंडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
घोडेगाव ः नेवासा तालुक्यातील महत्त्वाच्या घोडेगाव ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा गटाचे यशवंत येळवंडे यांची बहुमताने निवड झाली. उपसरपंच सौ. सुनिता संदीप येळवंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा गटाचे यशवंत पुनाजी येळवंडे विजयी झाले. येळवंडे  यांना 11 गडाख  गटाच्या लक्ष्मी गिरे यांना 7 मते पडली.
ग्रामपंचायतीत जनतेतून निवडून गेलेले सरपंच व 17 सदस्य असे एकूण 18 सदस्य आहेत. पीठासीन अधिकारी म्हणून सरपंच राजेंद्र दगडू राम देसरडा यांनी काम पाहिले. त्यांना ग्राम विकास अधिकारी एस. एस.घाडगे यांनी मदत केली.
यशवंत पुनाजी येळवंडे, लक्ष्मी विष्णू गिरे, मच्छिंद्र भास्कर कदम, वसंतराव नारायण सोनवणे, यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील मच्छिंद्र कदम वसंतराव सोनवणे यांनी अर्ज मागे घेतल्याने  यशवंत पुनाजी येळवंडे व  लक्ष्मी विष्णू गिरे  अर्ज राहिले होते.
यावेळी  भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा ,पारस चोरडिया, संजय चेमटे,  अशोक टेमकर,  मनोज बोरुडे, निसार सय्यद, अली भाई शेख ,विजू आव्हाड, फकड बराटे ,संदीप येळवंडे ,मच्छू कदम, दिलीप काळे ,बंटी लोखंडे, बाळू बरफे,राजू जाधव, पोलीस पाटील बाबासाहेब वैरागर,  कामगार तलाठी राजेंद्र भुतकर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here