पारनेर शहरासह सुपा औद्योगिक वसाहतीला गॅसपुरवठासाठी प्राधान्य द्यावे :जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

पारनेर शहरासह सुपा औद्योगिक वसाहतीला गॅसपुरवठासाठी प्राधान्य द्यावे :जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले

 पारनेर शहरासह सुपा औद्योगिक वसाहतीला गॅसपुरवठासाठी प्राधान्य द्यावे :जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले

व्यवसाय करत असताना गाडीलकरांनी सामाजिक बांधिलकी जपली:आमदार लंके 


नगरी दवंडी

पारनेर  प्रतिनिधी- सुपा येथे कैलास गाडिलकर यांनी समर्थ मल्टि सर्व्हिसेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिला सीएनजी पंपच्या माध्यमातून गुणवत्ता व दर्जेदार सेवा द्यावीत.याचबरोबर भारत गॅस कंपनीने औद्योगिक वसाहतीला गॅस पुराठ्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन कंपनीला जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले आहे.नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील नगर पुणे महामार्गावर सुपा येथील म्हसणे फाटा समर्थ मल्टि सर्व्हिसेस या जिल्ह्यातील पहिल्या सीएनजी पंपाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व आमदार निलेश लंके यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

यावेळी जिल्ह्याधिकारी राजेंद्र भोसले प्रांताधिकारी सुधाकर भोसले  तहसीलदार ज्योती देवरे भारत गॅसचे आदित्यकुमार,रंगनाथन श्रीपाद मांडगे‌,कैलास  कुलकर्णी,आदित्यकुमार, रंगनाथ के,दिनेश गाडगीळ,बजरंग राठोड,मनोज अडिगोपुला ,विराज केसुलकर,प्रतिक गायकवाड,कैलास गाडिलकर,बाळासाहेब गाडिलकर,शिल्पा गाडिलकर,माजी सभापती शरद झोडगे,दादा शिंदे,संदेश कार्ले,कारभारी पोटघन‌,बाळासाहेब खिलारी,दत्तात्रय निवडुंगे‌,मंडलाधिकारी शिवाजी शिंदे,आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले की जिल्ह्यांत या सीएनजी च्या पहिला ‌पंपामुळे वैभवात भर पडली आहे. चारचाकी वाहने व‌ इंधनाचे दर वाढत चालली आहे गाडीलकर सर यांचे वडील सरकारी नोकरदार मात्र गाडीलकर सरांनी हे पाऊल उचलले आहे ह्या समर्थ मल्टी सर्विसेस त्या दिशेने पाऊल आहे की भविष्यात काय घडणार आहे भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचा उद्योग चालणार आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे त्यांच्या मल्टिसर्व्हिसेस नावांमध्ये समर्थ आहे.

कंपनीने पारनेर शहरात घरोघरी गॅस सेवा पुरवण्याचे पहिले‌ काम करावे ‌मग नगर. शहरात काम सुरू करावे असेही जिल्ह्याधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले.

यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की या कंपनीने जो ‌न्याय पारनेर तालुक्यातील सुपात जिल्ह्यांतील पहिला सीएन जी पंप देवुन न्याय दिला आहे.गाडीलकर यांनी जिद्द चिकाटीने हे सर्व उभे  केलेले आहे शाळा कॉलेज डिप्लोमा कॉलेज बीएड कॉलेज उभे केले आहे सुपा औद्योगिक ‌वसाहतीत असणारा उद्योग व्यवसायिकांबरोबर चारचाकी वाहनांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.तर दुसरीकडे चार दिवसांपूर्वी झालेल्या दिव्यांग वधू-वर मेळाव्यावेळी अंध व अपंगांचा खर्च गाडिलकर सर करणार आहे.व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे यापुढील काळातही दर्जेदार सुविधा यापुढील काळातही द्याव्यात असे आमदार निलेश लंके म्हणाले आहे.  यावेळी भारत गॅस कंपनीचे आदित्यकुमार म्हणाले की सुपा पाठोपाठ‌ ८ ते ९ सीएनजी स्टेशन नगर शहरात सुरू करणार आहे.त्याच पाठोपाठ औरंगाबाद शहरामध्ये पण ८ ते‌९ सीएनजी पंप चालू करण्यात येणार आहे. 

कंपनी चालता-फिरता डिझेल पंप सेवा देणार आहे जिथे फॅक्टरी असतील किंवा रोडचे काम चालू आहे जेसीबी आहे अशांना अशा साइट्सवर ड्रेसमध्ये जनरेटर मध्ये किती लिटर डिझेल लागते तिथे डिझेल घरपोच किंवा त्या फॅक्टरी पर्यंत पोहोचण्याची सुवीधा पुरवण्यात येणार आहे.

सुपा एमआयडीसी व पारनेर नगरपंचायत येथे प्रथम सुविधा पुरवावी

अहमदनगर शहरांमध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये  कनेक्शन द्वारे गॅस घरपोच सुविधा पुरवठा केला जाणार आहे त्यादृष्टीने वितरण करता येईल त्या दृष्टिकोनातून निश्चित मी त्यांना मदत करेल आणि त्यांनी विशेष करून इतर शहरापेक्षा त्यांनी प्रथम सुपा एमआयडीसी च्या परिसरामध्ये आणि पारनेर मध्ये नगरपंचायत या ठिकाणी त्याचे काम प्रथम करावे असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.


 जिल्हाधिकाऱ्यांकडून आमदार निलेश लंकेना मास्क भेट.

सुपा येथील सीएनजी पंप च्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आमदार निलेश लंके यांना कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मास्क भेट देऊन हा मास्क वापरावा असे आहवान केले.कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून या आजारापासून बचाव करण्यासाठी हा मास्क वापरावा असेही जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले.

No comments:

Post a Comment