पारनेर येथे होणार महाराष्ट्र केसरी साठी निवड चाचणी! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

पारनेर येथे होणार महाराष्ट्र केसरी साठी निवड चाचणी!

 पारनेर येथे होणार महाराष्ट्र केसरी साठी निवड चाचणी!

छत्रपती क्रिडा संकुलनात स्पर्धेचे आयोजन.



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अहमदनगर जिल्हा निवड चाचणीसाठी पारनेर तालुका कुस्ती निवड चाचणी गुरुवार दि. 25 रोजी पारनेर येथील छत्रपती कुस्ती संकुलन येथे होणार असल्याची माहिती पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी केली जाती ती निवड चाचणी पारनेर येथे दि. 25 रोजी होणार असून सकाळी 9:30 ते 11 यावेळी स्पर्धेसाठी वजन घेतले जाणार आहे.

तालुक्यातील निवड चाचणी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे ही स्पर्धा फक्त वरिष्ठ गटासाठी माती आणि गादी विभागात होणार आहे यामध्ये 57 61 65 70 74 79 86 92 97 किलो वजन गट व महाराष्ट्र केसरी गट 86 ते 125 वजन गट यात ही स्पर्धा होणार आहे.

छत्रपती कुस्ती संकुलन येथे या स्पर्धेसाठी आयोजन करण्यात आले आहे कोरोना संदर्भातील सर्व नियमावलीचे पालन करून ही निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत.

कुस्ती संकुलन याद्वारे तालुक्यातील खेळाडूंना आपण संधी उपलब्ध करून दिली आहे कोल्हापुर च्या धर्तीवर येथे खेळाडू तयार करण्याचे काम केले जात आहे या निवड चाचणीसाठी तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे

- युवराज पठारे अध्यक्ष पारनेर तालुका तालीम संघ

No comments:

Post a Comment