किरण खाडे यांचा संघर्ष ग्रामीण भागांमध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल:- प्रा मधुकर (आबा) राळेभात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

किरण खाडे यांचा संघर्ष ग्रामीण भागांमध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल:- प्रा मधुकर (आबा) राळेभात

 किरण खाडे यांचा संघर्ष ग्रामीण भागांमध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल:- प्रा मधुकर (आबा) राळेभात



नगरी दवंडी 

जामखेड - आनंदवाडी गावातील विद्यार्थी किरण खाडे याने आता झालेल्या UPSC(CAPF) च्या परीक्षेत देशात 41 वा क्रमांक मिळवून त्याची केंद्रीय पोलीस दलात DY.S.P पदी निवड झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी प्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.सोमनाथ शिंदे यांनी केले.प्रा मधुकर राळेभात यांच्या हस्ते मा.किरण खाडे साहेब याचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या मित्रांची संगत करण्याचा मोलाचा सल्ला दिला.स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांना भक्कम पाठिंबा देण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमात बोलताना प्रा मधुकर राळेभात म्हणाले किरण खाडे यांचा संघर्ष ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनसाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी करत असलेल्या विविध उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी प्रा.अमोल ढाळे,प्रा.पवार प्रा.संभाजी गायवळ ,श्री.मयूर भोसले सर श्री.शिंदे बी.एस. सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र बारस्कर यांनी केले तरआभारप्रदर्शन भाऊसाहेब देवकर यांनी केले.

No comments:

Post a Comment