सुवर्णकार समाजाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संतोष वर्मा यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

सुवर्णकार समाजाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संतोष वर्मा यांची नियुक्ती

 सुवर्णकार समाजाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संतोष वर्मा यांची नियुक्ती


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सोन्यावार हॉलमार्कींग सक्तीचे करण्यचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागातील सोनारांना हॉलमार्कींग करण्यासाठी वस्तू घेवून शहरात यावे लागते, हे फार रिस्की आहे. सरकारने अधिकार्‍यांचे घरे चालण्यासाठी व मोठ्या कार्पोरेट व्यावसायीकांना अधिक श्रीमंत करण्यासाठीच सोन्यावर हॉलमार्कींग करण्याचा सक्तीचा निर्णय घेतला आहे. या कायद्याला सर्वप्रथम मी आवाज उठवत जाहीरपणे विरोध केला आहे. या विरोधात आता सर्वांनी संघटितपणे लढा देण्याची वेळ आली आहे. सोनार व्यावसायिकांना संपण्याच्या या कायद्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने आपण लढा देवू. तसेच कलम 411 नुसार सोनार व्यावसायिकांवर पोलिसांकडून होणार्‍या कारवाईतही वाढ झाली आहे. कुठली चौकशी न करता पोलीस चोरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सराफांना अतिशय वाईट वागणूक देत आहेत. या दोन्ही अन्याया विरोधात सर्वांना संघटीत होवून आंदोलन करावे लागणार आहे. सोनाराचा व्यवसाय टिकण्यासाठी भारतीय सुवर्णकार समाज संघटनेच्या एका छात्राखाली सर्व व्यावसायीकांनी गटतट विसरून एकत्र यावे. लवकरच थेट दिल्लीत जावून केंद्र सरकारकडे या बाबत तक्रार करणार आहे, असे प्रतिपादन भारतीय सुवर्णकार समाज संघटनेचे नूतन राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष वर्मा यांनी केले.
भारतीय सुवर्णकार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र येरपुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉलमार्कींग सक्तीला व कलम 411 ला विरोध करण्यासाठी नगर जिल्हा सराफ सुवर्णकार व्यावसायिकांची महत्वपूर्ण बैठक नगरमध्ये झाली. या बैठकीत सराफ सुवर्णकार व्यावसायिकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करणारे संतोष वर्मा यांची भारतीय सुवर्णकार समाजाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र येरपुडे यांनी नियुक्ती केली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोनार समाजाचे निवडून आलेले सदस्य व नूतन सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष वर्मा यांनी भारतीय सोनार समाजाच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिपक शहाणे, नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी समीर माळवे व नगर शहराध्यक्षपदी संजय देवळालीकर यांची नियुक्ती केली. यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष अरुण उदावंत, जिल्हा उपाध्यक्ष रवी डहाळे,  कैलास भांबुर्डेकर, गणेश मैड, सागर मैड, दिलीप नागरे, मनोज चिंतामणी, राजेश मिरांडे, किरण वर्मा, महेश वर्मा, सुभाष शहाणे, दिपक देडगावकर, अतुल पंडित, सचिन दीक्षित, राजेंद्र मस्के आदी पादाधीकारंसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सराफ व्यावसायिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment