सर्व क्षेत्रात महिला प्रामाणिकपणे काम करत नेतृत्व करत आहेत- न्या. देशपांडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

सर्व क्षेत्रात महिला प्रामाणिकपणे काम करत नेतृत्व करत आहेत- न्या. देशपांडे

 सर्व क्षेत्रात महिला प्रामाणिकपणे काम करत नेतृत्व करत आहेत- न्या. देशपांडे

हळदी कुंकू समारंभात जिल्हा न्यायालयात महिला वकिलांना अनोख्या स्टेशनरी वाणाचे वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्हा न्यायालया मधील वकिलांच्या बारचे व महिला वकीलांचे खूप चांगले काम चालू असल्याने येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव पदाला प्राधान्य दिले. याठिकाणी न्यायिक काम करतांना खूप काही शिकण्यास मिळत आहे. करोना काळातही सर्व वकिलांनी सहकार्य करत चांगले काम केले आहे. सर्व क्षेत्रात महिला प्रामाणिकपणे काम करत नेतृत्व करत आहेत. यात महिला वकीलही मागे नाहीत. लॉकडाऊन नंतर महिला वकिलांनी हळदी कुंकच्या कार्यक्रमाचा चांगला उपक्रम न्यायालयात राबवून उपयुक्त वाणांचे वाटप केले आहे. या कार्यक्रमानिमित्त सर्व महिला वकिलांमध्ये सहभगी होतांना आनंद होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे यांनी केले.
जिल्हा न्यायालयात महिला वकिलांसाठी अ‍ॅड. अनुराधा येवले व वकील संघटनेच्या महिला सहसचिव अ‍ॅड. मीनाक्षी कराळे यांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव पदी रेवती देशपांडे या प्रथमच महिला न्यायाधीश झाल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी अ‍ॅड. पूजा गुंदेचा, अ‍ॅड. कुंदा दांगट, अ‍ॅड.शिल्पा बेरड, अ‍ॅड.स्वाती वाघ, अ‍ॅड.जया पाटोळे, अ‍ॅड.अनिता दिघे आदींसह महिला वकील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात न्या.रेवती देशपांडे यांच्या हस्ते महिला वकिलांना अ‍ॅड. अनुराधा येवले यांनी फाईल फोल्डर, 15 रुपयांच्या तिकीटांसह वकील पत्र व लीगल पेपर, हायलाईटर, ग्लूस्टिक असे वकिलांसाठी उपयुक्त अनोखे स्टेशनरी वाण दिले. तसेच अ‍ॅड. मीनाक्षी कराळे कराळे यांनी महिलांना मास्कचे वाटप केले. राजमाता जिजामातांची प्रतिमा देवून पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.
अ‍ॅड. पूजा गुंदेचा म्हणाल्या, महिला वकीली क्षेत्रात असत्यावर सत्याने मात करत चांगले काम करत प्रगती करत आहेत. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देत आहेत. महिलांमध्ये आपुलकी, माया ममताची भावना आहेत. म्हणून महिला वकील पुरुषांपेक्षा अधिक चांगले काम करत आहेत.
प्रस्ताविकात अ‍ॅड. अनुराधा येवले म्हणाल्या, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव पदी प्रथमच एक महिला न्यायाधीशांची नियुक्ती झाल्याचा आनंद व अभिमान आम्हा महिला वकिलांना आहे. मागचे वर्ष फारच संकटाचे होते. आता न्यायालयात पुन्हा नव्या उत्साहात कामकाजास सुरवात झाली आहे. जवळजवळ वर्षाने महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमा निमित्त आज महिला वकील एकत्र आल्या आहेत. त्यामुळे महिला वकिलांना दैनदिन कामकाजास उपयुक्त होईल असे स्टेशनरीचे वाण दिले आहे. अ‍ॅड. मीनाक्षी कराळे म्हणाल्या, जिल्हा न्यायालयात न्यायाधीश व वकिलांचे चांगले अटूत नाते आहे. त्यामुळे न्यायिक कामकाज वेगाने होत आहे. न्यायालयात महिला वकिलांचा मोठा सहभाग होत आहे.अ‍ॅड. अनिता दिघे यांनी आईच्या जीवनावर कविता सादर केली. अ‍ॅड. वृषाली तांदळे यांनी आभार मानले. यावेळी आरती पाटील, दिपाली झांबरे, मनीषा पंदुरे, प्रियांका देठे, श्रुती हलदार, भावना पलीकुंदवार, नीलम खेडकर, गरीश्मा पंडित, सुजाता कुमार, नीलिमा औटी, प्रज्ञा उजागरे, रत्ना दळवी, स्नेहल गायकवाड, प्रिया खरात, पल्लवी पाटील, सविता साठे, हिरवे झारेच्या सरपंच अनुजा काटे, मोनिका भुजबळ आदी महिला वकिलांसह  महिला पोलीस पूनम पंडित, पूनम आरणे, श्वेता परमार उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment