स्वातंत्रवीर वीर सावरकरांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील- भैय्या गंधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

स्वातंत्रवीर वीर सावरकरांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील- भैय्या गंधे

 स्वातंत्रवीर वीर सावरकरांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील- भैय्या गंधे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वातंत्रवीर वीर सावरकर यांनी देशासाठी जे बलिदान दिले आहे, ते आपण कधीही विसरता कामा नये.  स्वतंत्र्य मिळविण्याची त्यांची असलेल्या तळमळ त्यामुळेच त्यांना ‘स्वातंत्रवीर’ ही पदवी देण्यात आली. त्याचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. केंद्रातील भाजपा सरकाराने अंदमान बेटावर स्वातंत्रवीर सावरकरांचे स्मारक निर्माण करुन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला आहे. सावरकरांचे विचार आपण आत्मसात करुन त्याप्रमाणे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
याप्रसंगी नरेंद्र कुलकर्णी  म्हणाले, अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. त्यांनी अनेक समाजसुधारणा केल्या तसेच मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अशा थोर देशभक्तांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण समाजात काम केले पाहिजे, असे आवाहन केले. याप्रसंगी उपाध्यक्ष शिवाजी दहिंडे, सचिन पारखी, प्रविण ढोणे, उदय अनभुले, अविनाश साखला, नरेश चव्हाण, चंद्रकांत पाटोळे, लक्ष्मीकांत तिवारी, नितीन जोशी, अजय राऊत ज्ञानेश्वर धीरडे आदि उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपच्यावतीने गांधी मैदान येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, तुषार पोटे, मंडल अध्यक्ष अजय चितळे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment