नेवासा कारभार्‍यांनो, नजर केवळ अर्था’ वर नको थेट निधीमुळे होऊ शकतो गावांचा कायापालट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

नेवासा कारभार्‍यांनो, नजर केवळ अर्था’ वर नको थेट निधीमुळे होऊ शकतो गावांचा कायापालट

 नेवासा कारभार्‍यांनो, नजर केवळ अर्था’ वर नको थेट निधीमुळे होऊ शकतो गावांचा कायापालट

सरपंचांना थेट 15 लाखापर्यंत खर्च करण्याचा अधिकार

नेवासा- जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींच्या निवडणूक पार पडली त्यात 53 ग्रामपंचायती मध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली असून सरपंच,उपसरपंच यांच्या निवडी हि पार पडल्या.निवडणूक संपली असून समाजसेवा सुरु करुन नवनिर्वाचित सदस्यांनी कामकाज सुरु करण्याची वेळ आली आहे, कारभारी कर्तुत्ववान असला की गावाचा विकास होतो. ग्रामपंचायतीची सत्ता म्हणजे पैसे मिळवण्याचे कुराण नसून गावाचा विकास करण्याची संधी आहे. त्यामुळे राजकारण अर्थकारण बाजूला ठेवून नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि  सदस्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात 767 ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. काही काही गावात सत्ताधार्‍यांनी पुन्हा बाजी मारली तर अनेक ठिकाणी परिवर्तन झाले गावाचा विकास व्हावा यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत या योजनांतून लाखो रुपयाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळू लागला आहे तर  सरपंच यांना पंधरा लाख रुपये विकास कामांवर खर्च करण्याचे थेट अधिकार आहेत. त्यामुळे सत्ता केंद्र आणि हे अर्थकारण अनेकांच्या नजरेसमोर असते.

या योजनांतून मिळतो निधी
ग्रामपंचायतीचे स्व उत्पन्न( करांपासून मिळणारे उत्पन्न) ग्रामनिधी( ग्रामपंचायतीसाठी राज्य शासनाने आकारणी करून वसूल केलेल्या करा मधील ग्रामपंचायतीचा हिस्सा) 15 वा वित्त आयोग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत अभियान,(सांडपाणी ,घनकचरा व्यवस्थापन निधी), जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणारा निधी लोकसहभाग, स्थानिक खाजगी कंपन्यांकडून मिळणारा सी एस आर, शासनाकडून मिळणारी बक्षिसे, पारितोषिके, पुरस्कार रक्कम असे उत्पन्नाचे स्रोत आहेत.केंद्राकडून सर्व शिक्षा अभियान, बाल विकास योजना, बायोगॅस, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आशा योजनेतून मोठा निधी थेट ग्रामपंचायतीकडे येतो मात्र यातून शासनाच्या उद्देशाप्रमाणे गावाचा विकास होत आहे का, याची तपासणी होणे गरजेचे आहे.

जाहीरनाम्याची पूर्तता होणार का...?
प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात आणि जाहीरनाम्यात जगभर आश्वासने दिली जातात. निवडणूक संपल्यानंतर मात्र तो जाहीरनामा कोपर्यात पडतो, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे किमान यावेळी तरी जाहीरनाम्यातील काही मुद्दे तरी प्रत्यक्षात मार्गी लागावेत, अशी अपेक्षा मतदार आतून व्यक्त होताना दिसत आहे. आज अनेक गावांमध्ये वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांचा देखील वानवा आहे, अनेक गावात ’नदी उशाला अन् कोरड घशाला’ अशी परिस्थिती आहे. गटारी आणि रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असून बहुसंख्य गावात पाणंद रस्त्याची तर वाट लागली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कित्येकांना रेशनचे धान्य ही मिळत नाही. अनेक गावात किडांगण हेच माहित असतील तर त्यांची दुरावस्था आहे. रोजगार निर्मितीसाठी तर काहीच प्रयत्न होताना दिसत नाही आज गावाच्या विकासासाठी पैशाची कमतरता नाही, कमी आहे. ती कारभार्‍यांच्या इच्छाशक्तीची गावाचा विकास करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची सत्ताधार्यांची तयारी हवी त्यादृष्टीने अचूक नियोजनाची आत्तापासून अत्यंत गरज आहे.
आपल्याला कोणी मतदान केले आणि कोणी विरोधात प्रचार केला, आपल्या बरोबर कोण होते, असे मुद्दे आता बाजूला ठेवून सत्ताधार्‍यांनी प्रत्येकाची आजचं सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची आणि आपला वार्ड आदर्श करण्यासाठी सदस्यांनी विविध उपाय योजना राबवण्याची गरज आहे अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे.

मोजक्याच गावांची कामगिरी उल्लेखनीय
जिल्ह्यात 767 ग्रामपंचायती च्या निवडणूक पार पडली आहे.आत्तापर्यंत फक्त  केवळ बोटावर मोजण्या इतपत गावांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पारनेर तालुक्यातील हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी, नेवासा तालुक्यातील सुरेश नगर, भेंडा बुद्रुक या गावातील तत्कालीन कारभार्‍यांनी गाव आदर्श करून दाखवले आहे या गावाचा आदर्श घेऊन सत्ताधार्‍यांनी प्रत्येक गावात तसे काम करण्याची गरज आहे.

कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची तरुणांना संधी.
गावाच्या कारभारात यावेळी मोठ्या संख्येने तरुणांची एन्ट्री झालेली आहे. अनेक गावात तर मातब्बर नेत्यांच्या पॅनलचा पराभव तरुणांनी केला आहे. त्यामुळे तरुणांकडून ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, तरुण पोरे गावाचा विकास करतील अशी भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित तरुणांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून गाव ’सुजलाम् सुफलाम्’ करण्यासाठी जोमाने काम करण्याची मागणी होत आहे.

अनेक गावात योजनाच राबवल्या जात नाही..!
गाव एक सक्षम करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून विविध योजनांमार्फत लाखो रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या शेकडो योजना आहेत प्रत्यक्षात अनेक गावात त्या योजना राबवल्या जात नाहीत कोण तो उपद्व्याप करायचा असा विचार करून कारभारी योजनाच राबवत नाहीत. परिणामी गावाच्या विकासासाठी पुरेसा निधी येत नाही काही योजना जरी सक्षम पणे राबवल्या तरी प्रत्येक गाव समृद्ध नक्कीच होईल.

- जयकिसन वाघपाटील

No comments:

Post a Comment