शेडगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. संध्या शेंडे यांची तर उपसरपंचपदी विजय रसाळ यांची बिनविरोध निवड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 10, 2021

शेडगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. संध्या शेंडे यांची तर उपसरपंचपदी विजय रसाळ यांची बिनविरोध निवड.

 शेडगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. संध्या शेंडे यांची तर उपसरपंचपदी विजय रसाळ यांची बिनविरोध निवड.


श्रीगोंदा -
राजकीय दावे-प्रतिदावे यामुळे गाजलेल्या तालुक्यातील शेडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी नाहाटा यांचे खंदे समर्थक असलेल्या विजय शेंडे यांच्या पत्नी सौ. संध्या शेंडे यांची तर उपसरपंचपदी विजय रसाळ यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
               11 सदस्य संख्या असलेल्या शेडगाव ग्रामपंचायती साठी झालेल्या निवडणुकीत विजय शेंडे यांच्या पैनलने 8 जागा निवडून आणत बहुमत मिळवित विरोधकांना चारी मुंड्या चित केले. सरपंचपद हे सर्वसाधारण स्त्री साठी राखीव झाल्यानें सरपंच पदासाठी माजी सरपंच विजय शेंडे यांच्या पत्नी सौ. संध्या शेंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले तर उपसरपंचपदी विजय रसाळ यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. मागिल पंचवार्षिक मध्ये अपूर्ण राहिलेली कामे माजी सरपंच विजय शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणार असून राज्यात शेडगाव हे आदर्श करण्याकडे वाटचाल करणार असल्याचे सरपंच उपसरपंच निवड पार पडल्यानंतर सरपंच संध्या शेंडे व उपसरपंच विजय रसाळ यांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here