लिटिल फ्लॉवरच्या माध्यमातून मुलांनी लुटला गिर्यारोहणाचा आनंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

लिटिल फ्लॉवरच्या माध्यमातून मुलांनी लुटला गिर्यारोहणाचा आनंद

 लिटिल फ्लॉवरच्या माध्यमातून मुलांनी लुटला गिर्यारोहणाचा आनंद


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः उंच डोंगरावर आपला तोल सांभाळत चढाई करणारे गिर्यारोहक पाहिल्यावर पाहणार्यालाही स्फुरण येते. गिर्यारोहणाचा असाच आनंद नुकताच नगरमधील बालगोपाळांनी घेतला. लिटिल फ्लॉवर फ्री स्कुलच्यावतीने या ट्रेकींग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नगर - औरंगाबाद रोडवरील इमामपूर फाट्याजवळ असलेल्या उंच डोंगरावरील खिर्नीचा महादेव मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेतले. सकाळच्या थंडीत उंच डोंगरावर चढाई करताना सगळ्यांचाच उत्साह ओसंडून वाहत होता.लिटिल फ्लॉवर प्री स्कूलच्या संचालिका मनिषा बोगावत व विशाल बोगावत यांनी मुलांना ट्रेकिंगचा अनुभव मिळावा, निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त बागडता यावं म्हणून हा अभिनव उपक्रम राबवला. 4 वर्षांवरील मुलं मुली यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळीच सगळा बालचमु आंनदधामच्या पवित्र वातावरणात एकत्र आला. येथून बसमधून सर्वांनी इमामपूरकडे कूच केली. डोंगराच्या पायथ्याशी वीरश्री युक्त घोषणा देत चढाईला सुरुवात करण्यात आली. मोठ्यांच्या देखरेखीखाली सगळे अतिशय उत्साहात डोंगरमाथ्यावर पोहचले. उंचावरून आजुबाजुचा परिसर न्याहाळताना प्रत्येकाचा चेहरा खुलला होता. गिर्यारोहण करताना काय काळजी घ्यायची, किती आव्हानांना तोंड द्यावे लागते याची तोंडओळख मुलांना झाली.मनिषा बोगावत यांनी सांगितले की, करोनामुळे अनेक महिन्यांपासून मुलं घरातच डांबून राहिली आहेत. आता परिस्थिती बरीच बदललेली असल्याने निसर्गाच्या कुशीत ट्रेकिंगचा उपक्रम राबवला. मुलांमध्ये धाडस व निसर्गाप्रती आवड निर्माण होण्यासाठी हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरेल.

No comments:

Post a Comment