मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज : आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज : आ. संग्राम जगताप

 मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज : आ. संग्राम जगताप

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने मोफत वाण आरोग्य शिबिर संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कुटंबाच्या प्रगतीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. कायम घरातील कामे,मुलांच्या व कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत असताना या धकाधकीच्या जीवनामध्ये ते आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतात. यासाठी महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्यावतीने मोफत वाण आरोग्य शिबिराचे आयोजन करुन समाजामध्ये एक प्रेरणादायक संदेश दिला आहे. मकर संक्रांतिनिमित्त महिला हळदी-कुंकुवाच्या कार्यक्रमामध्ये भेटवस्तू देत असतात. परंतु भेटवस्तू ऐवजी यानिमित्त महिलांच्या आरोग्याची तपासणी करून निरोगी आरोग्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने वाण आरोग्याचे उपक्रमा अंतर्गत महिलांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना रेशमा आठरे म्हणाल्या की, या शिबिरामध्ये दुर्बिणीद्वारे मोफत नेत्रतपासणी शिबीर, मोतीबिंदू, लासूर आणि डोळ्यांचे सर्व प्रकारची तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये 268 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच गरज असेल त्याला चष्माचे वाटप मोफत वाटप करून रुग्णांना औषधे मोफत देण्यात आली. ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज आहे त्यांना एजन्सीमार्फत मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करून दिली जाईल असे, असे ते म्हणाले. यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, नगरसेवक कुमार वाकळे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. रणजित स्त्रे, नेत्ररोग तज्ञ डॉ. व्हेरॉणिका फ्रान्सिस, अरविंद शिंदे, युवती अध्यक्षा अंजली आव्हाड, ओबीसी शहरअध्यक्ष अमित खामकर, युवराज शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आदी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here