धनुर्विद्यामधील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

धनुर्विद्यामधील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 धनुर्विद्यामधील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

आपल्या आवडीच्या खेळामधून विद्यार्थी करिअर करू शकतो : डॉ. सागर बोरुडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळाकडे वळावे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थी हा खेळापासून व मैदानापासून लांब होत चालला आहे. विद्यार्थी आपला बराचसा वेळ मोबाईलमध्ये घालवत आहे. आपल्या आवडीच्या खेळामध्ये विद्यार्थी करिअर करु शकतो. त्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव देण्याचे काम करावे. खेळामुळे विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होते. विविध क्रीडा संघटनांनी समाजामध्ये पुढे येऊन क्रीडा स्पर्धांचा आयोजन केल्यास विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ निर्माण होईल. अहमदनगर जिल्हा धनुर्विद्या संघटना व स्वराज्य क्रीडा सामाजिक प्रतिष्ठान सावेडी यांनी जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करुन खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे, असे प्रतिपादन नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केले.
    अहमदनगर जिल्हा धनुर्विद्या संघटना व स्वराज्य क्रीडा सामाजिक प्रतिष्ठान सावेडी यांच्यावतीने 19 व्या जिल्हा स्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेचे (कुमारगट) उद्घाटन नगरसेवक डॉ. सागर बोरुडे व मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या हस्ते संपन्न झाले.
    डॉ. शुभांगी रोकडे म्हणाले की, या स्पर्धेमधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धा ही 18-19 फेब्रुवारी 2021 रोजी संपन्न होणार आहे. धनुर्विद्या या खेळामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत भर पडून त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते. असे ते म्हणाले. यावेळी धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. शुभांगी रोकडे, सचिव अभिजित दळवी, सामाजिक प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा पल्लवी चव्हाण, रुपेश बेरड, सचिन घावटे, पांडुरंग उदे, योगेश वायकर, सागर चव्हाण, प्रतिक बनकर, रवी आमले, विजय गवळी, मिनित सोनवणे, अमित होनमाने, रणजीत सिंह वर्मा, मनोज काशीद आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment