नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाही साडेचार हजाराची लाच स्वीकारताना लाईटमनला रंगेहात पकडले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाही साडेचार हजाराची लाच स्वीकारताना लाईटमनला रंगेहात पकडले

 नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाही साडेचार हजाराची लाच स्वीकारताना लाईटमनला रंगेहात पकडले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः विद्युत जोडणी लवकर देऊन मीटर बसवुन देण्यासाठी तक्रारदाराकडून साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारताना वीज कंपनीच्या असिस्टंट लाईनमनला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
    सदर घटनेची हकीकत अशी की तक्रारदार यांनी त्यांचे राहाता तालुक्यातील आडगाव खुर्द, येथील राहते घरी विद्युत जोडणी घेण्याकरिता वडिलांच्या नावे कोटेशन भरले होते. विद्युत जोडणी लवकर देऊन मीटर बसवुन देण्यासाठी यातील आरोपी निर्मल यांनी तक्रारदार यांच्याकडे 4500 रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणीत आरोपीने पंचासमक्ष 4500रुपये लाचेची मागणी केली. सदरची रक्कम सोमवार दि. 8 रोजी सापळा रचून कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडुन पंचा समक्ष, (हॉटेल साई छत्र, लोणी ता.राहाता) येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. यात नवनाथ नामदेव निर्मल, (वय 43, धंदा -सहायक तंत्रज्ञ, (असिस्टंट लाईनमन) (रा. अस्तगाव रोड, पिंप्री निर्मळ ता. राहाता) याला ताब्यात घेतले आहे. सदर कारवाही मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक  यांच्या मार्गदर्शनाखाली श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर, हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर, पो हवा तन्वीर शेख,  पो ना प्रशांत जाधव. पो ना.चौधरी, विजय गंगुल, पो शि रविंद्र निमसे, वैभव पांढरे, मपोशि राधा खेमनर,  संध्या म्हस्के.  चालक पो ह. हरुन शेख.

No comments:

Post a Comment