ज्ञानसंपदा शाळेत 5 वि ते 10 वीचे नियमित वर्ग सुरु - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

ज्ञानसंपदा शाळेत 5 वि ते 10 वीचे नियमित वर्ग सुरु

 ज्ञानसंपदा शाळेत 5 वि ते 10 वीचे नियमित वर्ग सुरु


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मेडियम ,सावेडी मध्ये शासकीय आदेशानुसार कोरोना संदर्भात सर्व नियम पाळून नियमित वर्ग सुरु करण्यात आले.शाळा सुरु करतांना पालकाकडून हमीपत्र  व संमतीपत्र स्वीकारले गेले. शाळेच्या प्रवेशद्वारावर  बसविलेल्या अत्याधुनिक यंत्राद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करण्यात आली. हात स्वच्छ करण्यासाठी सनीटायझर ही यंत्रातून प्रत्येकाला मिळत होते.शाळेतील प्रत्येक वर्ग , कार्यालय व परिसराचे पूर्ण निर्जतुकीकरण करण्यात आले.नोव्हेबर मध्ये 9 वि 10 वीचे वर्ग सुरु झाले होते व आता 5 वि ते 8 वीचे वर्ग सुरु झाले असल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना एकमेकांना भेटून संवाद साधता आल्याने सर्वांना समाधान व आनंद प्राप्त झाला.शाळेच्या मुख्याध्यापिकास शिवांजली अकोलकर  व शिक्षकानी सर्व विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत केले.ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मेडियम ,सावेडी मध्ये शासकीय आदेशानुसार कोरोना संदर्भात सर्व नियम पाळून नियमित वर्ग सुरु करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिवांजली अकोलकर  व शिक्षकानी सर्व विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत केले.

No comments:

Post a Comment