श्रीराम जन्मभूमी निधीस श्रीरामकृष्ण पतसंस्थेचे एक लाख अकरा हजार एकशे अकराचे योगदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

श्रीराम जन्मभूमी निधीस श्रीरामकृष्ण पतसंस्थेचे एक लाख अकरा हजार एकशे अकराचे योगदान

 श्रीराम जन्मभूमी निधीस श्रीरामकृष्ण पतसंस्थेचे एक लाख अकरा हजार एकशे अकराचे योगदान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सर्वसामान्यांचे आर्थिक हित जोपासताना सामाजिक भान जोपासत विविध उपक्रम राबविणार्‍या श्रीरामकृष्ण  क्रेडीट सोसायटीने श्रीराम मंदिर जन्मभूमी निधी संपर्क अभियानासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असून अशा देश हित कार्याला बळ देणारे असल्याचे मत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केले.
   श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण निधी समर्पण अभियानात श्रीरामकृष्ण पतसंस्थेचे एक लाख अकरा हजार एकशे अकराचे योगदान धनादेश संस्थेचे चेअरमन श्रीगोपाल धूत यांच्या हस्ते भास्करगिरी महाराज यांच्या कडे सुपूर्त  करण्यात आला.यावेळी भास्करगिरी म्हणाले की, सर्व भारत वासियांचे स्वप्न पूर्ण करणारे हे भव्य मंदिर लवकरच उभे राहीलच यात शंकाच नाही, तसेच मंदिर उभारणीचे हे अभियान जगाला एकतेचा व समर्पणाचा नवा संदेश देईल असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी राजाभाऊ मुळे, रामदासी, व्हा.चेअरमन विश्वनाथ कासट, संचालक सर्वश्री ओमप्रकाश चांडक, गोपाल मणीयार, राजेंद्र गुजराथी, लक्ष्मिकांत झंवर, प्रकाश गांधी, जगदीश दरक, राजेंद्र मालु, अशोक बंग, राजेंद्रकुमार कंत्रोड, मथुराबाई झंवर,देवराव साठे,व्यवस्थापक शशिकांत पुंडलिक,कुमार आपटे उपस्थित होते.
   प्रास्ताविक व स्वागत श्रीगोपाल धूत यांनी केले, संस्थेच्या कार्याची त्यांनी माहिती दिली.सर्वसंचालकानी या उपक्रमासाठी एकमताने पाठिंबा दिला व प्रत्येक चांगल्या उपक्रमासाठी ही सर्वांचे कायम सहकार्य असते या बद्दल समाधान व्यक्त केले. आभार विश्वनाथ कासट  यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here