गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्य करणार -उपसरपंच अनिल करंडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्य करणार -उपसरपंच अनिल करंडे

 गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्य करणार -उपसरपंच अनिल करंडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः गेल्या अनेक वर्षांपासून दरेवाडीचा नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आता उपसरपंचच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न एक-एक करून सरपंचच्या सहकार्याने सोडवण्यासाठी जिल्हापरिषद मध्ये पाठपुरावा करून गावातील नागरिकांना सुविधा देऊन मला दिलेल्या संधीचे सोने करून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्य करणार. असे प्रतिपादन उपसरपंच अनिल करंडे यांनी केले.
    नगर तालुक्यातील दरेवाडीच्या उपसरपंचपदी अनिल करांडे यांची निवड झाल्याबद्दल नगर भाजपा युवामोर्चाच्या वतीने त्यांच्या सत्कार भाजपा कार्यकारणी सदस्य नितीन जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लक्ष्मीकांत तिवारी,व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश साखला, सौरब नावारे उपस्थित होते.
अनिल करांडे पुढे म्हणाले ग्रामपंचायत हि गावच्या विकासामधील मुख्य दुवा आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम करणार. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळवून देणार.निवडणुका संपल्या कि गावाने आपआपसातले मतभेद विसरून गावाच्या विकासाकडे एकजुटीने काम करावे. कारण सर्वाना बरोबर घेऊन काम केल्यास गावाच्या विकासाला चालना मिळते. प्रत्येक ग्रामपंचायतच्या विकासामुळे राज्याच्या व देशाच्या प्रगतीत भर पडत असते.

No comments:

Post a Comment