स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य व सुराज्यांसाठी आयुष्य पणाला लावे ः बोचुघोळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य व सुराज्यांसाठी आयुष्य पणाला लावे ः बोचुघोळ

 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य व सुराज्यांसाठी आयुष्य पणाला लावे ः बोचुघोळ

भाजप व चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्यावतीने चौपाटी कारंजा येथे अभिवादन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कायम अग्रणी राहिलेलो जहाल क्रांतीकारक होते. ’ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला’ सावरकरांच्या या काव्यपंक्तीतून त्यांचं देशाप्रती असलेलं प्रेम व्यतित होतं. दूरदृष्टी, विज्ञानवादी, क्रांतीकारक होते. समाज सुधारणेतील त्यांचे कार्यही अनमोल असे होते. सुमारे 60 वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी आपले आयुष्य पणाला लावले. अशा थोर देशभक्ताला अभिवादन करतांना अभिमान वाटतो. प्रतिष्ठान अशा थोर समाजसेवकांच्या आदर्शावर काम करत आहे, असे प्रतिपादन चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर बोचुघोळ यांनी केले.
    भाजप व चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चौपाटी कारंजा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सचिन पारखी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर बोचुघोळ, मिलिंद गंधे, कैलास दळवी, अदिनाथ येंडे, अमोल राजेभोसले,  ऋषीकेश वाघमारे, उमेश साठे, आक्रम पठाण, वैभव ताकपिरे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी वसंत लोढा म्हणाले, एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला. त्यांच्या दृष्टीची प्रचिती त्यांच्या कार्यातून दिसून येते असे सांगितले. याप्रसंगी मिलिंद गंधे, कैलास दळवी आदिनी मनोगत व्यक्त केली. शेवटी आदिनाथ येंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment