‘माझी वसुंधरा’ प्रतिज्ञेचे सार्वजनिक वाचन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

‘माझी वसुंधरा’ प्रतिज्ञेचे सार्वजनिक वाचन

 ‘माझी वसुंधरा’ प्रतिज्ञेचे सार्वजनिक वाचन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या सहभागातून निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधीत पंचतत्वांवर आधारित असणार्‍या या अभियाना अंतर्गत मानवी स्वभावामध्ये पर्यावरणपुरक बदल घडविण्यासाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांव्दारे प्रसार व प्रचार करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज रेसिडेन्शिअल ज्यू. कॉलेज, अहमदनगर या ठिकाणी कोव्हिड-19 च्या नियमांचे काटेकोर पालन करून पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या  माझी वसुंधरा या प्रतिज्ञेचे सार्वजनीक वाचन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित प्राचार्य श्री ए. आर. दोडके प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करतांना, समवेत उपप्राचार्य प्रा. कैलास गोरे, समन्वयक प्रा. गव्हाणे, क्रिडा संचालक प्रा. संदेश भागवत, प्रा. आकोलकर, प्रा. गदादे, प्रा. श्रीम. परदेशी, श्रीम. सानप व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment