शेतकर्‍यांसारखे मुंबईत बेमुदत आंदोलनाचा पतसंस्थांचा निर्णय ः काका कोयटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

शेतकर्‍यांसारखे मुंबईत बेमुदत आंदोलनाचा पतसंस्थांचा निर्णय ः काका कोयटे

 शेतकर्‍यांसारखे मुंबईत बेमुदत आंदोलनाचा पतसंस्थांचा निर्णय ः काका कोयटे

पतसंस्थांच्या सहकार संवाद कार्यशाळेस मोठा प्रतिसाद

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः राज्यातील सहकारी पतसंस्थांचा कारभार आता बँकांप्रमाणेच होत आहे. आता लवकरच पतसंस्था स्वतःचे सहकार क्रेडीट कार्ड, मोबाईल क्यूआर कोड मार्फत व्यवहार अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सेवा ग्राहकांसाठी सुरु करणार आहे. मात्र राज्य सरकार कडून आम्हाला कोणतेही सहकार्य मिळत नाहीये. बँकांच्या ठेवींना विमा संरक्षण आहे, मग पतसंस्थांच्या ठेवींना का नाही. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या धर्तीवर राज्यातील सर्व पतसंस्था येत्या एप्रिल महिन्यात मुंबईत बेमुदत मोठे आंदोलन करणार आहे. राज्यातील हजारो पतसंस्थांचे लाखो पदाधिकारी व कर्मचारी मंत्र्यालायावर धडक देणार आहे, असा इशारा राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी देत आ.सुधीर तांबे हे पतसंस्था चळवळीमधील कार्यकर्ते आहेत. त्यांनी आमच्या समस्या सरकारपर्यंत पोहचाव्यात अशी मागणी केली.
   राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन व नगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या वतीने नाशिक विभागातील पतसंस्थांच्या सहकर संवाद कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी काका कोयटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी आ. सुधीर तांबे होते.
प्रथम सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय सहनिबंधक राजेंद्र शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, पतसंस्था स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, पतसंस्था फेडरेशचे महासचिव शांतीलाल सिंगी, कर्याध्यक्ष राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, खजिनदार दादाराव तुपकर आदींसह नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पतसंस्थांचे सुमारे 700 प्रतिनिधी उपस्थित होते.
   आ.सुधीर तांबे म्हणाले, पतसंस्थांमुळेच राज्याच्या अर्थकारणाला गती मिळत आहे. राज्यातील पतसंस्था चळवळ सावकारी नष्ट करण्याचे काम करत आहे. पतसंस्था फेडरेशनचे काका कोयटे व सर्व पदाधिकारी खुप तळमळीने काम करत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करत आहे. यावेळी सहनिबंधक राजेंद्र शहा यांनी बहुमोल मार्गदर्शन करत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. फेडरेशन कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांची यवतमाळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव यांची बुलढाणा जिल्हा भाजपच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
   प्रास्ताविकात वसंत लोढा यांनी आंदोलनात्मक भूमिका मांडली ते म्हणाले, तीन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थांचे अनेक समस्या व प्रश्नांना वाचा फोडली. नुकताच सहकार खात्याने नाशिक जिल्हा बँकेत पतसंस्थांच्या अडकलेल्या करोडो ठेवींपैकी 15 % ठेवी परत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.पतसंस्था फेडरेशनच्या व्यवस्थापिका सुरेखा लवांडे यांनी सुत्रसंचलन केले, स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी आभार मानले.
   यावेळी फेडरेशनसंचालक गोविंद अग्रवाल, अ‍ॅड. अंजली पाटील, नारायणराव वाजे, नगर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष साबाजी गायकवाड, नंदुरबार फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.कांतीलाल टाटीया, धुळे फेडरेशनचे अध्यक्ष अरुण महाले आदी उपस्थित होते. संगमनेर तालुका फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब टाक व संग्राम पतसंस्थेचे अध्यक्ष राणीप्रसाद मुंदडा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

No comments:

Post a Comment