कोठावळे राष्ट्रवादी बळकट करतील : आ. लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

कोठावळे राष्ट्रवादी बळकट करतील : आ. लंके

 कोठावळे राष्ट्रवादी बळकट करतील : आ. लंके

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कोठावळेंनी घेतली आ.लंकेंची भेट

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः
राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचा अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या राजेश्वरी कोठावळे यांनी आपल्या  युवती सहकार्‍यांसमवेत पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांची भेट घेतली. राजेश्वरी कोठावळे यांची असलेली वैचारिक बैठक व सत्यवादी विचारसरणी  व सामाजिक-राजकीय कामाची आवड, युवतींचे जिल्ह्यात असलेले मोठे संघटन यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा ताई सलगर यांनी त्यांची नुकतीच अहमदनगर  राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.  या पार्श्वभूमीवर  कोठावळे यांनी आपल्या युवती सहकार्‍यांसमवेत आमदार निलेश लंके यांची भेट घेतली. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके म्हणाले की राजेश्वरी कोठावळे यांचे समाजात असलेले  राजकीय-सामाजिक काम हे मोठे आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात कोरोना रुग्णांना मोफत योग साधना शिकविली आहे व रुग्णांचे मानसिक संतुलन  योग्य राहण्यासाठी प्रयत्न केले होते.  तसेच त्या महिला सक्षमीकरणासाठी ही प्रयत्न करत आहेत. राजेश्वरी कोठावळे यांच्या पाठीमागे युवतींचे  अहमदनगर जिल्ह्यात मोठे संघटन असून त्या माध्यमातून राष्ट्रवादीचे व पवार साहेबांचे विचार ते तळागाळात पोहोचवतील यात कोणतीही शंका नाही.यावेळी पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्षा सुवर्णा घाडगे व पारनेर तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षा पुनम मुंगसे व पारनेर शहर  राष्ट्रवादी युवती अध्यक्षा दिपाली औटी, माया रोकडे मनिषा शेळके, स्वाती इंगळे, सुमन कोठावळे, जगताप मॅडम, अश्विनी काकडे, आदी यावेळी  सहकारी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment