भिंगारमध्ये केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्तींचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 25, 2021

भिंगारमध्ये केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्तींचा सत्कार

 भिंगारमध्ये केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्तींचा सत्कार

डॉ. राजेंद्र फडके यांच्या उपस्थितीत बूथ रचना बैठक संपन्न

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजेंद्र फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत भिंगार भाजपाची बूथ रचना बैठक झाली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, भिंगर मंडल अध्यक्ष वसंत राठोड, शहर जिल्हाउपाध्यक्ष सचिन पारखी, नरेंद्र कुलकर्णी आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत डॉ.राजेंद्र फडके यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे, मुद्रा लोन योजनेचे व उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींचा सत्कार करण्यात आला.
   यावेळी डॉ.राजेंद्र फडके म्हणाले, बूथ रचना हा भाजपचा पाया आहे. याच पायावर संपूर्ण देशात भाजपाचे कामकाज होत आहे. त्यामुळे प्रत्तेक शहरात, मंडला मध्ये बूथ रचना उत्कृष्ठपणे व्हावी यासाठी सर्व पादाधीकारींनी लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील सर्व जनतेच्या उद्धारासाठी शेकडो लाभाच्या योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व जनते पर्यत योजना पोचवण्याचे काम बूथ रचनेद्वारे व्हावे यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. भिंगार मध्ये भाजपाच्या माध्यमातून योजनांची चांगल्याप्रकारे अंमलबजावणी होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
   यावेळी  शहर अध्यक्ष महेंद्र गंधे यांनी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड यांनी प्रसाताविकात कामाची माहिती देतांना सांगितले, भिंगारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी बजावणी साठी काम केले जात आहे. आत्तापर्यंत हजारो सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे. शासकीय कर्मचारी व बँकेच्या कर्मचारी जनतेची अडवणूक करत असहकार्य कारभारा विरोधात थेट दिल्लीपर्यंत तक्रारी केल्याने जनतेला न्याय मिळवून दिला आहे. यावेळी शहर कार्यकारीणी सदस्य लक्ष्मीकांत तिवारी, सरचिटणीस महेश नामदे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, दिपक फळे, छत्तुशेठ मेवानी, अतुल मुनोत, संजय स्वामी, श्रीमती रॉक, कृष्णा पारेकर, राजेश फुलारे, संजय सदलापूरकर, कार्तिक जाधव, किरण सपकाळ, नाफीसा नगरवाला व कार्यकर्ते उपस्थित होते. दिपक फळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here